एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode Highlights : सागर आणि मुक्ताच्या प्रेमाचा होणार बेरंग; आदित्यला पुढे करून सावनीचा कुटील डाव

Premachi Goshta Latest Episode Highlights : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागर आणि मुक्तामध्ये प्रेमाचा रंग खुलण्याआधीच बेरंग होणार आहे. आदित्यच्या खांद्यावरून सागरवर सावनी निशाणा साधला आहे.

Premachi Goshta Latest Episode Highlights : 'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिकेत  सागर आणि मुक्तामध्ये प्रेमाचा रंग खुलण्याआधीच बेरंग होणार आहे. आदित्यच्या खांद्यावरून सागरवर सावनीने निशाणा साधला आहे. आता होळीच्या दिवशी सागरच्या प्रेमाची आणि आदित्यसोबतच्या नात्याची होळी होणार आहे.

सगळ्यांसमोर सागर देणार प्रेमाची कबुली

धुळवड साजरी करत असताना मुक्ताकडून चुकून सागरला रंग लावला जातो. धुळवड साजरी न करणारा सागर मुक्ताला रोमँटिकपणे रंग लावतो. त्यानंतर हातात माईक घेऊन सागर सगळ्यांसमोर मुक्ताचे कौतुक करत असतो. मुक्तामुळे मला खरे प्रेम मिळाले असल्याचे सागर सगळ्यांसमोर सांगतो. सागर मुक्ताला सगळ्यांसमोर प्रपोज करतो. धुळवडीच्या दिवशी प्रेमाची कबुली दिल्याने सगळे आनंदी असतात. सागरने प्रेम व्यक्त केल्याने मुक्ता भारावून जाते. तिला सागरसोबतची पहिली भेट, त्यानंतर सुरू झालेला प्रवास आठवतो.

मुक्ताच्या कौतुकाने सावनी आणि आदित्यची चिडचिड

सागरकडून मुक्ताचे होणारे कौतुक पाहून सावनी आणि आदित्य चिडतो. मुक्तामुळे आपली आई दुखावली असल्याची गोष्ट आदित्यच्या मनात असते. त्यातच सावनीदेखील मुक्ताबद्दल त्याच्या मनात द्वेष भरत असते.  त्याच्या परिणामी तो मुक्तावर चिडत असतो. चिडलेला आदित्य पाहून सावनी त्याच्या मनात आणखी द्वेष भरते. सागर तुझ्यासोबत चुकीचे वागत असल्याचे सावनी सांगते. सावनीचे बोलणं ऐकून आदित्यला राग अनावर होतो.

आदित्य सागरला उलटसुलट बोलणार

चिडलेला आदित्य हा सागरवर आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हणतो. माझ्यासाठी आणि आईला कोणताही त्रास नाही. माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीच नाही हे मान्य करा असे टोकाचे आदित्य बोलतो. सावनी हे सगळं पाहत असते.  सागर आदित्यची समजूत काढण्याचे प्रयत्न करतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे, सगळं संपून जाईल पण प्रेम नाही संपणार असे सागर आदित्यला म्हणतो आणि त्याने सही करण्यासाठी दिलेले कागदपत्रे त्याच्या हाती सोपवतो. 

सावनीने टाकलेल्या जाळ्यात सागर अडकणार का, आदित्यने दिलेल्या कागदपत्रांवर केलेल्या सहीने सागर अडचणीत येणार का, आदित्य आणि सागरच्या नात्यात आणखी वितुष्ट येणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत. 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा
'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा
Phula Marathi Film: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोकसंगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार, 'फुला' सिनेमाचं पोस्टर, संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोकसंगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार, 'फुला' सिनेमाचं पोस्टर लॉन्च
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget