Premachi Goshta Latest Episode : सागरचा रोमँटिक अंदाज, मुक्ताला दिलं सरप्राईज; नात्याची पुन्हा सुरुवात की...
Premachi Goshta Latest Episode : प्रेम व्यक्त करण्यासाठी संधीच्या शोधात असलेला सागर रोमँटिकपणे मुक्ताला प्रपोज करणार आहे. मात्र, सागरचे मनापासून मुक्तावर प्रेम आहे का, सागरच्या मनात आणखी काही वेगळं सुरू आहे?
Premachi Goshta Latest Episode : प्रेम व्यक्त करण्यासाठी संधीच्या शोधात असलेला सागर रोमँटिकपणे मुक्ताला प्रपोज करणार आहे.सागर आणि मुक्ता रोमँटिक क्षणात असताना कोळी कुटुंबीयांची एन्ट्री होते आणि सागरचा प्लॅन अर्धवट राहतो. घरातील लोकांसमोर दोघेही लाजतात. मात्र, सागरचे मनापासून मुक्तावर प्रेम आहे का, सागरच्या मनात आणखी काही वेगळं सुरू आहे, अशा प्रश्नाची उत्तरे 'प्रेमाची गोष्ट'च्या (Premachi Goshta) आजच्या भागात मिळणार आहेत.
घरातील लोकांना सागर बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यास पाठवतो. स्वत: मात्र पोटदुखीचे कारण सांगून मुक्ताला घरी थांबण्यास सांगतो. घरातील लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुक्ताला सागर औषध आणण्यासाठी पाठवतो आणि घराची सजावट करतो. औषध आणण्यासाठी मुक्ता घरात येते तेव्हा घर सजले असल्याचे दिसते. नेमकं काय सुरू आहे, हे मुक्ताच्या लक्षात येत आहे. सागरच्या सरप्राईजने मुक्ता भारावून गेली असून तिला शब्दच सुचत नाहीत. सागर मुक्ताला पहिल्यांदाच मिसेस मुक्ता कोळी असे म्हणतो. त्यावेळी मुक्ताच्या डोळ्यात सागरबद्दल प्रेम दिसून येते.
सागर मुक्ताला प्रपोज करतो. या प्रकाराने मुक्ता हसू आवरत नाही. सागर मुक्ताला आपल्या मनातील भावना बोलून दाखवतो. सईची आई म्हणता म्हणता तुम्ही बायकोची कर्तव्ये पार पाडलीत आणि फक्त बायकोच नाही सून आणि वहिनी म्हणून जबाबदारी पार पाडली. एकदा हे नातं पुन्हा नव्याने सुरू करुयात, रिस्टार्ट करुयात असे सागर मुक्ताला म्हणतो. त्यावर मुक्ता सागरला नात्याची मजा हळूवारपणे उलगडले पाहिजे असे सांगते.
घरातल्या लोकांची एन्ट्री आणि प्लॅनचा फियास्को
सागर मुक्ता रोमँटिक क्षणात असताना घरातील इतर सगळेजण एन्ट्री करतात आणि सागरची पोटदुखी का असते हे समजून येते. सागरच्या या प्लॅनवर घरातल्यांना हसू आवरत नाही.
घरातील सगळेजण आल्याने सागर-मुक्ता लाजतात आणि बेडरुममध्ये जातात.
सागरच्या मनात खरंच मुक्ताबद्दल प्रेम?
मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी सागरची धडपड सुरू असते. मात्र, सागरच्या मनात आणखी काही वेगळं सुरू असते. सागरला सावनीला उत्तर द्यायचे असते. त्यासाठी सागर या रोमँटिक सरप्राईजचे मोबाईल लपवून चित्रीकरण करत असतो. पण मोबाईलमध्ये रेकोर्डिंग झाले नाही. ज्यावेळी मुक्ता सागरला नाते हळूहळू उलगडले पाहिजे असे सांगते तेव्हा सागर मनात हळू हळू काय, मी मुव्ह ऑन झालोय हे सावनीला दाखवायचे आहे असे म्हणतो. मुक्ता आणि तुझ्यात प्रेम नाही हे सावनीने सुनावलेले शब्द सागरला बोचत असतात. त्यामुळे सागरचा हा सगळा खटाटोप सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.