(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta Episode Updates : आदित्यच्या बर्थ डे पार्टीत वादावादी होणार; सावनी-हर्षवर्धनला सई दाखवणार आरसा
Premachi Goshta Episode Updates : आजच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा रंगणार आहे. सागर-हर्षवर्धनमध्ये शाब्दिक चकमक घडणार आहे. तर, दुसरीकडे सई ही सावनीला आरसा दाखवणार आहे.
Premachi Goshta Episode Updates : आदित्यच्या बर्थ डे पार्टीत आल्यानंतर सावनी आणि हर्षवर्धनकडून सागर-मुक्तावर शाब्दिक वार सुरू आहेत. सावनी मातृत्वाच्या मुद्यावरून मुक्ताला सातत्याने लक्ष्य करत आहे. 'प्रेमाची गोष्ट'च्या (Premachi Goshta) आजच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा रंगणार आहे. सागर-हर्षवर्धनमध्ये शाब्दिक चकमक घडणार आहे. तर, दुसरीकडे सई ही सावनीला आरसा दाखवणार आहे.
'प्रेमाची गोष्ट'च्या आजच्या एपिसोडमध्ये आदित्यच्या मनात सावनीने रुजवलेला तिरस्कार दिसणार आहे. त्याआधी सागर कोळी आणि हर्षवर्धन यांच्यात शाब्दिक चकमक घडणार आहे.ज्यांच्या मनात चोर असतो ते नजर चोरतात असा टोमणा हर्षवर्धन सागरला लगावतो. त्यावर सागर कोळी हा हर्षवर्धनला म्हणतो की, जे चोर असतात ते इतक्या आत्मविश्वासाने बोलतात, आधी प्रेम चोरलं आता मुलगा चोरला असे सागर म्हणतो. त्यावर हर्षवर्धन हा तू माझ्या घरी येण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधतोस. तुझ्यापेक्षा जास्त मान घरातील वेटरला देतो असे सुनावतो.
इंद्राने आपल्या लाडक्या नातवासाठी गाजरचा हलवा करून पाठवला आहे. आदित्य तो खाईल का, याची चिंता तिला सतावत आहे. नातू दूर झाला तरी आजीच्या प्रेमाचा ओढा कमी झाला नाही.
आदित्यच्या मनात सागर-मुक्ताबद्दल तिरस्कार आहे. सागर आणि मुक्ता आदित्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातात. मात्र, पण आदित्य त्यावर तुसडेपणाने रिएक्ट होतो. इंद्राने बनवलेला गाजराचा हलवा सागर आदित्यला देतो. पण, आदित्य न खाताच बाजूला ठेवून देतो. सागरला आदित्यच्या कृतीचे वाईट वाटते.
सई दाखवणार आरसा...
सावनी ही सईला आपल्या बाजूला वळवण्यासाठी आणि तिच्याकडून कोळी कुटुंबात काय सुरू आहे, याची माहिती काढण्यासाठी गोडगोड बोलते. सईदेखील निरागसपणे काही माहिती देते. पण, त्याचवेळी सई ही सागर पप्पा आणि मुक्ताई कसे लाड पुरवतात, प्रेम करतात याची माहिती देते. सईकडून मुक्ताचे होत असलेले कौतुक ऐकून सावनीचा तिळपापड होतो. तुझ्या आठवणीत मला रडू येत असते असे सावनी सईला सांगते. हर्षवर्धनही तिला सामिल होतो. पण सई सावनी आणि हर्षवर्धनला आरसा दाखवते.
आजच्या एपिसोडमध्ये मेलोड्रामा असणार आहे. आदित्यच्या मनात सावनीने भरलेला तिरस्कार, सईची निरागसता आणि मुक्ताचा समजूतदारपणा दिसून आला आहे.