एक्स्प्लोर
Advertisement
प्रत्युषाला ड्रग्ज आणि दारुचं व्यसन होतं : राहुल राज
मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राजच्या दाव्यानुसार, प्रत्युषाला ड्रग्ज आणि दारुचं व्यसन होतं. इतकंच नाही तर तिच्यावर बँकांचं कर्जही होतं.
'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका साकारणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल रोजी गोरेगावच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंहवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने गर्भपात केला होता : डॉक्टर
राहुल राजच्या अंतरिम जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. मागील सुनावणीत आरोपी राहुल राजच्या अटकेवर आजपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. राहुल राजचा दावा राहुल म्हणाला की, "प्रत्युषाला ड्रग्ज आणि दारुचं व्यसन लागलं होतं. यामुळे अनेकदा ती स्वत:वरील नियंत्रण गमवून बसायची. प्रत्युषाला नशेचं व्यसन जडल्याचं तिच्या मित्र-मैत्रिणींना माहित होतं.‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
तसंच प्रत्युषावर कर्जाचं डोंगर होतं. त्यामुळे ती आर्थिक तणावाखाली होती. अनेक बँकांचं लोन तिच्यावर होतं, असंही राहुल राजने सांगितलं. आधी असं म्हटलं जात होतं की, मालिकेतील कामातून मिळणारे पैसे प्रत्युषाच्या आईच्या बँक अकाऊंटमध्ये जमा व्हायचे. काही वृत्तानुसार, "फॉरेन्सिक अहवालात म्हटलं आहे की, प्रत्युषाच्या शरीरात "इथाइल अल्कोहोल सापडलं आहे. मृत्यूच्यावेळी प्रत्युषाच्या शरीरात याचं प्रमाण 140 एमजी होतं."प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा
तर डॉक्टरांच्या मते, शरीरात 30 एमजीपेक्षा जास्त प्रमाणात अल्कोहोल नसावं. त्यामुळे मृत्यू झाला त्यावेळी प्रत्युषा खूपच नशेत होती. संबंधित बातम्याप्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात
प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची ‘ती’ मुलाखत!
‘प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे’
आत्महत्येवेळी प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती?
प्रत्युषानं याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता : सारा खान
प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
प्रत्युषाच्या विम्यावर राहुलने जबरदस्तीने स्वत:चं नाव लिहिलं होतं : राखी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement