एक्स्प्लोर
Advertisement
साडेतीन तासांची 'हाऊसफुल्ल' गोष्ट!
पण 'एका लग्नाची पुढची गोष्ट' मात्र त्याला अपवाद ठरतं आहे. मुळात मध्यंतरासह तीन तास असलेलं नाटक आता रंगत रंगत वाढतं आहे. या नाटकाची लांबी आता साडेतीन तास झाली आहे.
मुंबई : प्रशांत दामले आणि कविता लाड ही रंगभूमीवरची लोकप्रिय जोडी आहे. 'एका लग्नाची गोष्ट' केल्यानंतर कविता लाड-मेढेकर यांनी नाटकातून काहीकाळ ब्रेक घेत कुटुंबाकडे लक्ष दिलं. त्यानंतर त्या छोट्या पडद्याकडे वळल्या. इकडे प्रशांत दामले सातत्याने आपल्या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. पण कविता-प्रशांत यांची जोडी पुन्हा दिसेल की नाही याबद्दल मात्र काहीच बोललं जात नव्हतं. ही जोडी पुन्हा पडद्यावर यावी असं अनेकांना वाटत असूनही तो योग जुळून काही येत नव्हता. पण अखेर, 'एका लग्नाची पुढची गोष्ट' नाटक येण्याची चर्चा सुरु झाली आणि कविता लाड-मेढेकर पुन्हा एकदा रंगमंचावर उभ्या राहिल्या त्या प्रशांतसोबत.
प्रशांत दामले आणि कविता लाड एकत्र येणार ही बातमी नाट्यप्रेमींना सुखावणारी होती. नाटकाचे बोर्ड लागले, होर्डिंग्ज लागले. 'मला सांगा सुख म्हणजे..'चं गाणं पुन्हा एकदा रिक्रिएट झालं आणि लोक नॉस्टॅल्जिक झाले. साहजिकच कधी एकदा नाटक येतं असं झालं लोकांना. नाटक आलं आणि लोकांच्या या नाटकावर उड्या पडत आहेत.
या नाटकाचे व्यवस्थापक मंगेश कांबळी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले की, 'या नाटकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. 17 नोव्हेंबरला हे नाटक सुरु झालं. त्यानंतर रोज दोन-दोन प्रयोग लागत आहेत. ते सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यानंतर 22, 23, 24 आदी प्रयोगही काही हाऊसफुल्ल आहेत, तर काही हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. पुढचे प्रयोग ठरले असले, तरी बुकिंग अद्याप सुरु झालेलं नाही. पण ऑनलाईन बुकिंग जोरावर आहे. 17 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात या नाटकाचे जवळपास 60 प्रयोग होतील. हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल होतील यात शंका नाही.'
नाटक रंगतंय साडेतीन तास
अलिकडे लोकांना असलेला वेळ लक्षात घेऊन एक दिवसीय क्रिकेटचे सामने 20-20 वर आले. नाटक-सिनेमांचंही तसंच झालं. अलिकडे सिनेमे 100 मिनिटांवर तर नाटकं दोन तासांवर आली आहेत. पण 'एका लग्नाची पुढची गोष्ट' मात्र त्याला अपवाद ठरतं आहे. मुळात मध्यंतरासह तीन तास असलेलं नाटक आता रंगत रंगत वाढतं आहे. या नाटकाची लांबी आता साडेतीन तास झाली आहे. अर्थात, रसिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून ही लांबी वाढते. पण लोकांचा हशा, टाळ्या आणि वन्समोअर पाहता हा वेळ साडेतीन तासांवर जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement