Pandharinath Kamble : 'ती गोष्ट कायम लक्षात राहिल...', जान्हवीच्या वक्तव्यावर पॅडी कांबळेने व्यक्त केलं स्पष्ट मत
Pandharinath Kamble : बिग बॉसच्या घरात जान्हवीने पॅडी कांबळेविषयी केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. त्यावर आता पॅडी कांबळेनीच प्रतिक्रिया दिली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi new Season) अगदी पहिल्या दिवसापासून बरेच राडे सुरु होते. त्यातच जान्हवी (Jahnavi Killekar) आणि निक्की (Nikki Tamboli) या दोघींच्या वागण्यावर प्रेक्षकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. निक्कीचं वर्षाताईंशी बोलणं असो किंवा घरातील इतर सदस्यांसोबतचं वागणं असो, सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली. जान्हवीच्या वागण्यावरही सुरुवातीला बराच संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान मध्यंतरी एका टास्कदरम्यान जान्हवीने पॅडी कांबळेच्या करिअरवर भाष्य होतं. एका भांडणादरम्यान जान्हवीने म्हटलं होतं की, आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग केली, आता इथे येऊनही तेच करत आहेत, असं जान्हवीने म्हटलं होतं. त्यानंतर तिच्यावर कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत बराच रोष व्यक्त करण्यात आला. त्यावर आता स्वत: पॅडी कांबळेने प्रतिक्रिया दिली आहे.
पॅडीने काय म्हटलं?
पॅडीने कलाकट्टाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलंय. त्यामध्ये पॅडीने म्हटलं की, मी जान्हवीसोबत काम करेन, पण ती जे काही बोलली ते कायमच डोक्यात राहील. त्या गोष्टीचा मी बदला वैगरे घेणार नाही, पण ते माझ्या डोक्यात राहिल. जे झालं ते माझ्यासमोर झालं नाही. ती बाहेर गार्डन परिसरात होती आणि आम्ही लिव्हिंग एरियामध्ये बसलो होतो. तेव्हा आर्यानं ते ऐकलं होतं. कारण ती जान्हवीसोबत भांडत होती.
पुढे पॅडीने म्हटलं की, त्यानंतर मी आर्याला बोलावलं आणि तिला विचारलं की काय झालं. त्यावेळी ती मला म्हणाली की, दादा की तुमच्या करिअरविषयी बोलतेय. तुम्ही ओव्हर अॅक्टर आहात, ओव्हर अॅक्टिंग करता, असं ती म्हणतेय. तेव्हा मी तिला म्हटलं की, तू शांत हो. तिला शांत केलं. त्यावेळी मी म्हटलेलं की, देव करो आणि ती खूप मोठी अभिनेत्री होऊ दे आणि तिला माझ्याबरोबर काम करण्याचा योग आला, तर तिला निर्णय घेता येऊ दे की, मला या माणसाबरोबर काम करायचं नाही किंवा देवानं मला इतकं मोठं बनवू दे की, मला तिच्याबरोबर काम करायचं नाही, असं मी म्हणू शकेन.
पण मी तिला माफ केलं - पॅडी
हे सगळं मी तिथे रागात म्हणालो होते. त्यानंतर मलाच त्याचं वाईट वाटलं, कारण त्या गोष्टीसाठी तिला शिक्षा झाली आणि ती जेलमध्ये गेली. आपल्यामुळे तिला शिक्षा झाली असं मला वाटलं. मी तिच्यासोबत नक्की काम करेन,मी तिला माफही केलंय. पण त्या गोष्टी कायम लक्षात राहतील.