![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bigg Boss Marathi : का जळताय माझ्यावर? जळू नका करपून जाल; सूरजवर जळतोय पॅडी दादा, नेमकं प्रकरण काय?
Bigg Boss Marathi Season 5 : प्रोमोमध्ये पॅडी दादा सूरजवर चिडलेला दिसत असून त्याने वर्षाताईंकडेही नाराजी व्यक्त केली आहे, यामागं नेमकं कारण काय? ते जाणून घ्या.
![Bigg Boss Marathi : का जळताय माझ्यावर? जळू नका करपून जाल; सूरजवर जळतोय पॅडी दादा, नेमकं प्रकरण काय? Paddy Kamble angry on suraj chavan and varsha usgaonkar what is the matter Bigg Boss Marathi News Bigg Boss Marathi : का जळताय माझ्यावर? जळू नका करपून जाल; सूरजवर जळतोय पॅडी दादा, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/ff2a7862868774c0e918dd034ed2adf91725450846714322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi New Season Day 39 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. आज घरात सर्वच सदस्य धुमाकूळ घातलाना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात 39 वा दिवस सुरु असून घरात फुल ऑन कल्ला पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे गंमतीत पॅडी दादा सूरजवर चिडलेला दिसणार आहे.
सूरजवर जळतोय पॅडी दादा, वर्षाताईंवरही नाराजी
बिग बॉसच्या घरात पॅडी दादा वर्षा ताई आणि सूरजवर चिडलेला दिसत आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताई सूरजला जेवायला बोलवत आहेत. वर्षा ताईंनी फक्त सूरजला बोलावल्याने पॅडी दादा मात्र नाराज झाला आहेत. पॅडीने वर्षाताईंकडे आपली नाराजीदेखील व्यक्त केली आहे. तर, दुसरीकडे सूरजला असं वाटत आहे की, पॅडी दादा त्याच्यावर जळत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात सदस्यांची खेळण्याची पद्धत बदलली
बिग बॉस मराठीच्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली असून टीम A आणि टीम B मधल्या सदस्यांनी खेळण्याची पद्धत बदलेली दिसून येत आहे. या सगळ्याचा परिणाम प्रत्येकाच्या खेळण्यावर दिसणार आहे.बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. आजच्या भागात काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
BB फार्मचा जोरदार टास्क
View this post on Instagram
'अरबाजमागे उभे राहिलो, हेच पांग फेडायला लागले'
दुसऱ्या एका प्रोमोममध्ये वर्षाताई अभिजीतशी बोलताना म्हणतात, "अरबाजमागे आम्ही उभे राहिलो, तरीही हेच पांग फेडायला लागले. त्याला वाटतं की, तो टॅग पुसून टाकणार आहे. त्यावर अभिजीत वर्षाताईला म्हणतो, अरबाजने पहिलं पाऊल पण चिखलात टाकलं आणि दुसरं पण पाऊल चिखलातच टाकतो आहे. हे सगळं अरबाज ऐकलं आणि निक्की म्हणाली, "मी अभिजीतच्या विरुद्ध आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aishwarya Rai : जलसामध्ये जाताना ऐश्वर्याच्या लेकीची बॉडीगार्डकडून अडवणूक? आराध्याचा सोशल मीडियावरचा VIDEO पाहून नेटकरी चिंतेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)