Bigg Boss Marathi Season 5 Day 13 : लसणावरून वादाची फोडणी; अरबाजवर चिडलेली निक्की ढसाढसा रडली, पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Season 5 Day 13 : आता नॉमिनेशनच्या टास्कवरून या ग्रुपमधील अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीत वाद झाल्याचे दिसून येत आहे. या वादानंतर निक्की ढसाढसा रडली.
![Bigg Boss Marathi Season 5 Day 13 : लसणावरून वादाची फोडणी; अरबाजवर चिडलेली निक्की ढसाढसा रडली, पाहा व्हिडीओ Nikki Tamboli crying after angry on Arbaz Patel in Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi New Season Bigg Boss Marathi Season 5 Day 13 : लसणावरून वादाची फोडणी; अरबाजवर चिडलेली निक्की ढसाढसा रडली, पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/faddfc62e0ebadaecff359c3f118ee561723195306085290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi Season 5 Day 13 : यंदा 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi New Season) नवा सीझन सुरू झाल्यानंतर घरात दुसऱ्याच दिवसापासून ग्रुप तयार होण्यास सुरुवात झाली. अरबाज पटेल, वैभव चव्हाण, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांचा एक गट तयार झाला असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला या ग्रुपमध्ये असणारी आर्या जाधवने हा ग्रुप सोडला. आता नॉमिनेशनच्या टास्कवरून या ग्रुपमधील अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीत (Nikki Tamboli) वाद झाल्याचे दिसून येत आहे. या वादानंतर निक्की ढसाढसा रडली.
बिग ब़ॉस मराठीच्या घरातील पहिला सीझन निक्की तांबोळीने गाजवला. सुरुवातीपासूनच निक्की चर्चेत आहे. निक्की आणि अरबाजच्या प्रेम प्रकरणाचीही चर्चा झाली होती. आता मात्र दोघांमध्ये लसूण वरून वाद झाल्याचे दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्क दरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतला. या टास्क दरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. फक्त लसूणावरून मला नॉमिनेट केल्याने निक्की चांगलीच संतापली आहे. आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावत दिसत आहे. दरम्यान "तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता", असं वैभव निक्कीला म्हणत आहे. त्यावर निक्की म्हणते,"गेलं खड्ड्यात...एवढं प्रेम दाखवूनदेखील मी नॉमिनेट झाली आहे".
View this post on Instagram
पॅडीने केली अभिजीतची नक्कल, सदस्यांनी केली धमाल
'बिग बॉस मराठी'च्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे. घरातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी बिग बॉस यांनी घरात कल्ला टीव्हीचा टास्क दिला आहे. यामध्ये घरातील सदस्यांना वेगवेगळे परफॉर्मन्स सादर करण्यास सांगितला आहे. गुरुवारनंतर आता शु्क्रवारीदेखील कल्ला टीव्हीचा टास्क सुरू राहणार असून उर्वरित सदस्य आपला परफॉर्मन्स सादर करणार आहेत. विनोदवीर पॅडी कांबळे आज धमाल करणार आहे. अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय,"हे बघा मित्रांनो.. आपण आज इथे आलो आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. गाणं ऐकूण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे". दरम्यान घरातील इतर सदस्य धमाल करताना दिसत आहेत.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)