Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; इंद्रा-दीपूच्या नात्याचं सत्य मालती देशपांडे सरांपासून लपवणार
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवं वळण आलं आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अखेर इंद्रा-दिपूच्या नात्याचं सत्य मालतीसमोर आलं आहे. आता हे सत्य मालती किती दिवस देशपांडे सरांपासून लपवून ठेवणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
प्रोमोमध्ये देशपांडे सर मालतीला म्हणत आहेत, दीपू हल्ली साळगावकराच्या घरी जास्त रमते. पण देशपांडे सर नुकतेच आजारपणातून बरे झाले आहेत. दीपू आणि इंद्राच्या नात्याबद्दल देशपांडे सरांना समजलं तर त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होईल. त्यामुळेच मालतीने इंद्रा-दिपूच्या नात्याचं सत्य देशपांडे सरांपासून लपवण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
'मन उडू उडू झालं' मालिकेत सध्या इंद्रा-दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.
संबंधित बातम्या
Godavari : 'FIPRESCI-India'च्या पहिल्या दहा भारतीय सिनेमांच्या यादीत 'गोदावरी'ला मानांकन
Jayeshbhai Jordaar Trailer : 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी सिनेमा होणार रिलीज
Rupali Bhosle : 'आई कुठे काय करते' मालिकेतील रूपाली भोसलेला झाली दुखापत; पोस्ट शेअर करत दिली माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
