एक्स्प्लोर

Lay Avadte Tu Mala : मातीतील अस्सल रांगडी प्रेमकथा, कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; 'लय आवडतेस तू मला'

Lay Avadte Tu Mala : 'लय आवडतेस तू मला' ही रांगडी प्रेमकथा 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे. सानिका आणि सरकारची प्रेम कहाणी पाहायला विसरु नका.

Lay Avadte Tu Mala : मातीतील अस्सल रांगडी प्रेमकथा आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील '#लय आवडतेस तू मला' ही मालिका सुरु होणार आहे. कळशीचा छावा अन् साखरगावच्या सुंदरीची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका सरळ रेषेत चालणाऱ्या आयुष्याचं, समाजाचं, हाडा-मासाच्या लोकांचं, त्यांच्या प्रेमाचं सत्य मांडणारी ही मालिका आहे. सानिका आणि सरकार या दोन पात्रांसह त्यांच्या गावांभोवती फिरणारी ही मालिका आहे. 

सानिका अन् सरकारची प्रेमकहाणी

काही दिवसांपूर्वीच मालिकेची पहिली झलक समोर आली असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महाराष्ट्रात आता फक्त एकच आवाज घुमणार '#लय आवडतेस तू मला!'. ही मालिका 14 ऑक्टोबरपासून रात्री 9:30 वा. आपल्या 'कलर्स मराठी'वर पाहता येणार आहे.

कलर्स मराठीची नवी मालिका लय आवडतेस तू मला

सानिका आणि सरकार या दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पात्रांभोवती फिरणारी '#लय आवडतेस तू मला!' ही मालिका आहे. दोन प्रेम करणाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचं प्रेम मान्य नाही अशा अनेक प्रेमकथा आजवर आपण पाहिल्या आहेत. पण साखरगावची अल्लड सानिका आणि कळशी गावचा रांगडा सरकार यांच्या प्रेमकथेला तर त्या दोघांच्या गावांचाच विरोध आहे. कारण या गावांमध्ये पिढीजात वैर आहे. जे एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही, अशा सानिका आणि सरकारचं अल्लड प्रेम वातावरणात बहरणार का? शत्रूत्वाच्या आगीत फुलणाऱ्या ही आगळीवेगळी प्रेमकथा उलगडणारी गोष्ट म्हणजे '#लय आवडतेस तू मला'.

मातीतील अस्सल रांगडी प्रेमकथा

छोट्या पडद्यावरील प्रेम कथेची चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न '#लय आवडतेस तू मला' या मालिकेत करण्यात आला आहे. आता छोट्या पडद्यावर प्रेम आणि शत्रूत्वाचा रंजक खेळ रंगणार आहे. गावाकडच्या गुलाबी प्रेमाची थरारक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तरुण वर्गासह सर्वांनाच आकर्षित करणारी ही मालिका आहे. थरार, नाट्य, रोमान्स अन् बरचं काही प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. 

कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी

'#लय आवडतेस तू मला' मालिकेतील सानिका खूपच निरागस, भावूक, जिद्दी आणि प्रेमळ आहे. तर सरकार तिच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तो गावचा छावा आहे. अत्यंत रावडी त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. एका वेगळ्याच संघर्षातून फुलणारं प्रेम प्रेक्षकांना या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत सानिकाचे वडील साहेबराव पाटील यांच्या भूमिकेत संजय खापरे आहेत. साहेबराव पाटील हे साखरगावच्या साखरकारखान्याचे मालक आहेत. तर सरकारचे वडील हे साखरकारखान्यातील कामगारांचे यूनियन लिडर आहेत. अभिनेते किरण माने या मालिकेत सरकारच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aai Tuljabhavani : उदे गं अंबे... आई तुळजाभवानी देवीचं हुबेहुब रुप साकारण्याचा प्रयत्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget