Navri Mile Hitlerla Serial Track: 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये प्रेमाचा बहर; एजे-लीलाला करणार प्रपोज; पुढे काय होणार?
Navri Mile Hitlerla Serial Track: न्यू इयर पार्टी मध्ये एजे करणार लीलाला प्रोपोज करणार आहे. "लीलाचा हा लूक पाहून सगळ्यांनी आपलं हसू आवरलं"; असं लीलानं सांगितलं.
Navri Mile Hitlerla Serial Track: 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) मालिकेत नव्या वर्षात, नवे धमाके होणार आहेत. ज्याची सुरुवात जहागीरदारांच्या न्यू इयर पार्टी मध्येच सुरू झाली. एजेला अखेर जाणीव झाली आहे की, त्याचं लीलावर प्रेम आहे. लीला एजेसाठी चहा बनवत असताना दुर्गा येऊन एजेची चहा बनवायची पद्धत वेगळी असल्याचं लीलाला सांगते. लीला तीच न ऐकता स्वतःच्या पद्धतीनं चहा बनवून एजेला देते.
एजे चहा पिताना लीला म्हणते, "तुम्ही माझं हृदय जिंकलंय, आता माझ्यासाठी काहीतरी खास करा." हे सर्व पाहून दुर्गाला हसू येतं. एजे विश्वाला आयडिया विचारण्यासाठी कॉल करतो, पण सर्व आयडिया नाकारतो. त्याच्या खोलीत एजे एका पांढऱ्या गुलाबांच्या बुकेसह उभा आहे आणि लीला हे पाहून खुश होते. एजे दुर्गाला एक साधी घरगुती न्यू ईयरची पार्टी आयोजित करण्याची सूचना देतो, ज्यामुळे दुर्गा आश्चर्यचकित होते. विश्वरूप दुर्गाला सांगतो की, एजेला कोणालातरी "आय लव्ह यू" म्हणायचं आहे, जे ऐकून दुर्गा असं कधीच होणार नाही असं म्हणते.
लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला पार्टीबद्दल चुकीची माहिती देतात. एजे आणि सुनाही पार्टीसाठी तयार होतात, आणि सर्वजण लीलाला उशिर होणार हे गृहीत धरतात. एजे सर्वांना सांगतो की, जरी लीला उशीरा आली तरी, ती परफेक्ट दिसेल. लाईट्स गेल्यावर, लीला एकदम वेगळ्या आणि विचित्र पोशाखात स्पॉटलाईटमध्ये येते. सर्वजण तिच्या दिसण्यावर हसू लागतात. नव्या वर्षाच्या पार्टीमध्ये एजे लीलाला हटके प्रपोज करणार आहे, त्यामुळे 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेच्या सीरिअल ट्रॅकमध्ये आता प्रेमाचे सूर उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेच्या धमाकेदार एपिसोडबद्दल लीलाची भूमिका साकारत असलेली वल्लरी विराज म्हणते , "लीला एक फिल्मी कॅरेक्टर म्हणून तयार होऊन येते. ती अशी का आणि कशी तयार होऊन येते, हे तुम्हाला सविस्तर एपिसोडमध्ये पाहायला जास्त मज्जा येईल. लीलाच हा जो लूक आहे, तो एका सिनेमा मधला आहे आणि हाच लूक का याच्याही मागचं एक कारण आहे. आम्ही या लुकसाठी खूप लूक टेस्ट केल्या आणि मग जाऊन हा लुक फायनल केला गेला. पहिलं तर जेव्हा या लूकमध्ये तयार झाले, त्यावेळी मला कसं तरी वाटलं कारण लीला नेहमी गोड आणि छान तयार होते. दिग्दर्शकांनी मला या लूक मागचा थॉट समजावला कसं स्टोरी आणि लीलाच्या कॅरॅक्टरला फायदा होणार आहे. त्यानंतर सगळं छान होऊन गेलं. माझा लूक पाहून टीमला खूप हसू येत होतं, पण मी नर्वस होईन, या भीतीनं कोणी हसलं नाही. एक अभिनेत्री म्हणून मला हे शिकायला मिळालं की, आपल्या लूकबद्दल विचार न करता काम करता आलं पाहिजे. प्रेक्षकांना हा सीन पाहायला नक्कीच आवडेल यात एजेची रिएक्शन बघणं हे ही मनोरंजक असणार कारण आता तो लीलाच्या प्रेमात पडला आहे."