एक्स्प्लोर
टीव्ही अभिनेता मनोज गोयलच्या पत्नीचा गळफास
अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता मनोज गोयल यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 40 वर्षीय निलिमा गोयल यांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे. निलिमा गोयल यांना नैराश्याने ग्रासलं होतं. नैराश्यातूनच आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. रविवारी दुपारी मनोज कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांची 8 वर्षांची मुलगी ट्युशनला गेली होती. त्यावेळी त्यांनी कांदिवलीतील राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. निलिमा गृहिणी होत्या. अभिनेता मनोज गोयल याने सब टीव्हीवर गोलमाल है भाई सब गोलमाल है, तू मेरे अगल बगल है यासारख्या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
भारत























