(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kiran Mane : भन्नाट जबराट नादखुळा भुमिका! ‘मुलगी झाली हो’तून एक्झिटनंतर किरण माने झळकणार नव्या चित्रपटात
Kiran Mane New Movie : मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता किरण माने (Kiran Mane) नवं काय करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता स्वतः किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Kiran Mane : ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतून काढून टाकल्यानंतर, मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रचंड चर्चेत आले आहेत. राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यावेळी सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यात काही नेटकऱ्यांनी किरण माने यांची बाजू घेत त्यांना समर्थन दिले, तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केले.
मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता किरण माने नवं काय करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. आता स्वतः किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ‘आनंद वो...निव्वळ आनंद...’ म्हणत त्यांनी आपण नवा चित्रपट करत असल्याची घोषणा केली आहे. ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात किरण माने यांची वर्णी लागली आहे. मात्र, या चित्रपटात ते कोणती व्यक्तिरेखा साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
वाचा किरण मानेंची पोस्ट :
‘आनंद वो...निव्वळ आनंद... नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपन वास्तवात ज्या विचारधारेची 'भुमिका' घेत असतो...लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी 'भुमिका' मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!!
"शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने..." अशी चेष्टा करत पोट धरून हसनारे आनि त्याचवेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देनारे मराठीतले दिग्गज कॅमेरामन संजय जाधव.. सोबत अपूर्वा नेभळेकर, ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके.. टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना, "आम्हाला माहीतीये ओ सर तुम्ही खूप चांगले आहात. कुणी काहीही म्हणू दे." असं बोलुन मला दिलासा देणारी माझी गांववाली मोनालीसा बागल... आर्ट डिरेक्टर वासू पाटील.. माझ्या मातीतला, अतिशय भला 'माणूस' असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे... प्रचंड मोठ्ठा तामझाम असलेला भव्यदिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करनारे निर्माते शशिकांत पवार... प्रताप गंगावणेंसारखा सिद्धहस्त लेखक.. आनखी काय पायजे?
...एक लै भारी किस्सा घडला परवा.. स्पॉटबॉय धावत-धावत व्हॅनिटीमध्ये आला... चेहर्यावर संताप दिसत होता.. "सर, फेसबुकवर एकानं तुमची टवाळी करत लिहीलंय.. 'आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं.' त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय 'आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय..' तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का??" मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची..
...बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्या बाजूला अशा व्यक्तीची भुमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला. मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं... प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची.. तोपर्यन्त न्यायाची दूसरी लढाई सुरू.. या आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, त्यातलीच ही एक... धन्यवाद अनुप..खूप खूप मनापासून आभार !!!’
संबंधित बातम्या
- Shahrukh khan : किंग इज बॅक! आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुख खानची पहिली पोस्ट
- Naagin 6 Promo : एकता कपूरच्या 'Naagin 6' चा प्रोमो रिलीज, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Happy birthday Dolly Bindra : बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘साईड कॅरेक्टर’, वादांमुळे नेहमीच चर्चेत राहिलीये डॉली बिंद्रा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha