Mrunal Dusanis : महाराष्ट्राच्या सोज्वळ सुनेला आहे निगेटिव्ह रोल्स करण्याची इच्छा, अभिनेत्री मृणाल दुसानिस म्हणाली, 'पण कोणी ऑफरच...'
Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस हीने निगेटिव्ह रोल्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण तशा ऑफर येत नसल्याचंही तिने म्हटलं.
Mrunal Dusanis : लाडकी सून म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हीने अभिनयातून ब्रेक घेत काही वर्ष तिच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिलं होतं. मृणाल ही चार वर्ष तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेत वास्तव्यास होती. पण आता ती भारतात परतली आहे. दरम्यान आता मृणाल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार असल्याचं तिने स्पष्ट सांगितलं. त्यामुळे मृणाल आता कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
दरम्यान मृणालने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला निगेटिव्ह रोल्स करण्याची इच्छा असल्याचं तिने म्हटलं आहे. पण तिला हे रोल्स कुणी ऑफर करत नसल्याचं मृणालने सांगितलं. दरम्यान याआधी मृणालने तिला बोल्ड सीन्स करायला देखील काही हरकत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता मृणाल कोणत्या भूमिकेत दिसणार याची वाट अनेकजण पाहत आहेत.
मृणालने नेमकं काय म्हटलं?
मृणाल म्हणाली की, 'निगेटिव्ह रोल्स करण्याची माझी खूप इच्छा आहे. पण सध्या सुरुवात तर मी मालिकांमधून करणार आहे. त्यामुळे हळू हळू जशी कामं येतील, तसं नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळी कामं करण्याचा प्रयत्न करेन. माझी तर खूप इच्छा आहे की, कुणीतरी मला निगेटिव्ह रोल द्यावा. पण मला निगेटिव्ह भूमिकांची ऑफर येतच नाही. मध्ये मी कुणालतरी म्हणाले होते की, प्लीज प्लीज मला निगेटिव्ह रोल् द्या. पण ते म्हणाले की नाही ते शक्यच नाही. काय होतं ना की, तुमचा चेहरा असा असतो की, असे रोल्स लोकं पटकन स्वीकारत नाहीत. पण जेव्हा तुम्ही एक कलाकार असता, तेव्हा वेगळ्या भूमिका करायला आवडतात. पण ते माझ्यापर्यंत येत नाहीत.'
बोल्ड सीन्स करण्यावर मृणालची स्पष्ट भूमिका
बोल्ड सीन्स करण्यावर मृणालने म्हटलं की, 'जशी तुम्ही एखादी व्यक्तीरेखा करता तेव्हा असं वाटतं की, ती व्यक्ती तशीच आहे. म्हणजे मी ज्या काही भूमिका केल्या आहेत, लोकांना असं वाटतं मी तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी बोल्ड सीन्स करायला तयार आहे.पण कोणताही गोष्टी डिसेन्सीने दाखवायला हवी. जर ती गोष्ट डिसेन्सीने दाखवली आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही.'