एक्स्प्लोर
किसिंग सीनमुळे 16 वर्षीय अभिनेत्रीची आई भडकली, सेटवर राडा
परंतु जन्नतच्या आईने यावर जोरदार आक्षेप घेतला. यावरुन त्यांनी सेटवर तुफान राडा केला.
मुंबई : 'फुलवा'मध्ये या टीव्ही मालिकेतील छोटी फुलवा म्हणजेच जन्नत जुबैर रहमानी सध्या कलर्स चॅनलवरील 'तू आशिकी'मध्ये दिसत आहे. या मालिकेत जन्नत आणि रित्विक अरोरा मुख्य भूमिकेत आहेत. पण किसिंग सीनमुळे जन्नतची आई आणि निर्मात्यांमध्ये सेटवर जोरदार वाद झाला.
16 वर्षांची जन्नत या मालिकेत पंक्तीची भूमिका तर रित्विक आहानची व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेत सध्या आहान आणि पंक्तीची प्रेमकहाणी दाखवली जात आहे. पंक्तीचं गायिका बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहान तिला मदत करत आहे. यावेळी या दोघांमध्ये एक रोमँटिक सीन दाखवला जाणार आहे.
सीनमध्ये रित्विकला किस करायचं आहे, असं जन्नतला सांगण्यात आलं. परंतु जन्नतच्या आईने यावर जोरदार आक्षेप घेतला. यावरुन त्यांनी सेटवर तुफान राडा केला.
निर्मात्यांनी आईचं ऐकलं नाही!
पंक्ती आणि आहानमध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात येणार होता. पण जन्नतची आई याच्याविरोधात होती. खरंतर जन्नतचं वय केवळ 16 वर्ष आहे. एवढ्या कमी वयात तिने कोणत्याही प्रकारचे इंटिमेट सीन करु नये असं तिच्या आईचं म्हणणं होतं. सेटवर निर्माते आणि जन्नतच्या आईमध्ये याबाबत चर्चाही झाली. पण ह्या चर्चेचं रुपांतर भांडणात झालं. यासंदर्भात निर्माते जन्नतच्या आईचं काहीही ऐकण्यास तयार नव्हते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement