एक्स्प्लोर

Milind Gawali: 'मला व्हिलनचा रोल त्यांनी ऑफर केला होता, तो रोल मी स्वीकारला नाही'; मिलिंद गवळी यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मिलिंद यांनी नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar) यांच्याबाबत लिहिलं आहे.

Milind Gawali: आई कुठे काय करते या मालिकेमधील अभिनेते  मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. मिलिंद यांनी नुकताच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री स्मिता जयकर (Smita Jaykar) यांच्याबाबत लिहिलं आहे.
 

 मिलिंद गवळी यांची पोस्ट

मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं,  'मी स्मिता जयकर' पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं. नियती कसा खेळ खेळत असते बघा,एखाद्या व्यक्तीची आपल्याला नियतीला जर भेट घालून द्यायची असेल तर कशीही काहीही करून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतेच येते,पंचवीस तीस वर्षांपूर्वी रमेश साळगावकर नावाचे दिग्दर्शक माझ्याकडे “सत्वपरीक्षा” नावाचा सिनेमा घेऊन आले होते, या चित्रपटांमध्ये मला त्यांनी एक भूमिका याचा आग्रह केला होता,लक्ष्मीकांत बेर्डे हिरो, रेशम टिपणीस हीरोइन आणि मला व्हिलनचा रोल त्यांनी ऑफर केला होता, मी  व्हिलन आहे म्हणून मी तो रोल स्वीकारला नाही आणि तो चित्रपट केला नाही, या चित्रपटामध्ये स्मिता जयकर त्या विलनच्या आई ची भूमिका करत होत्या, त्यांना भेटायची त्यांच्याबरोबर काम करायची संधी माझी गेली. त्यांची आणि माझी भेट व्हायचीच होती म्हणून सात आठ वर्षानंतर देवकी चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुणी कलाकार म्हणून एक दिवसाचं काम केलं. ईतक्या वर्षांने नियतीने आमची गाठ घालून दिली,पण फक्त काही तासांसाठी, फार ओळख ही झाली नाही आमची, मग दहा एक वर्षानंतर अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या सांस्कृतिक कला दर्पण कार्यक्रमांमध्ये आम्ही नाटक आणि सिनेमा याचे परीक्षक म्हणून एकत्र आलो . “देव बाभळी” “अनन्या” अशी सुंदर सुंदर नाटक एकत्र बसून बघितली , त्या नाटकांवर चर्चा केली योग्य त्या लोकांना बक्षीस दिली, या सगळ्या प्रवासामध्ये आमची एक छान निखळ मैत्री ही झाली, नियती कसा खेळ खेळते बघा , “सत्व परीक्षा” मध्ये मला व्हिलनचा रोल दिला होता म्हणून मी तो स्वीकारला नव्हता पण आजच्या तारखेला अनिरुद्ध देशमुख सारखा विलन मी सलग तीन वर्ष करतो आहे आणि आणि डोक्याचा भुगा झाला असल्याने ते डोकं ठिकाणावर ठेवण्यासाठी स्मिताजीच मला सातत्याने मदत करतात. या वाल्याचा वाल्मिकी होण्याचा मार्ग स्मिताजींच्या  Through जातो आहे का? कदाचित नियतीलाच माहीत असेल.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Milind Gawali: 'एक छोटीशी परी तुमच्या घरी येते आणि...'; लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांची खास पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget