Mi Pan Nathuram Godsech Boltoy : 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' नाटक वादात; नाट्यप्रयोग सुरू असताना सावरकरप्रेमींनी घातला गोंधळ
Mi Pan Nathuram Godsech Boltoy : अहमदनगरमध्ये सुरु असलेल्या 61 व्या हौशी राज्य नाट्यस्पर्धच्या पहिल्याच दिवशी नाट्यप्रयोग सुरू असताना सावरकरप्रेमींनी गोंधळ घातला.
Mi Pan Nathuram Godsech Boltoy Marathi Play : अहमदनगरच्या माऊली सभागृहात सुरू असलेल्या 61व्या हौशी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली. ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हा गोंधळ झाला आहे. या नाटकात दिग्दर्शक आणि कलाकारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप सावरकरप्रेमींनी केला आहे.
नाट्यप्रयोग सुरू असताना सावरकरप्रेमींचा गोंधळ
अहमदनगरमध्ये सुरु असलेल्या 61 व्या हौशी राज्य नाट्यस्पर्धच्या पहिल्याच दिवशी नाट्यप्रयोग सुरू असताना सावरकरप्रेमींनी गोंधळ घातला. चुकीचा इतिहास खपवून घेणार नाही अशी भूमिका सावरकरप्रेमींनी व्यक्त केली आहे. मी ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकात महात्मा गांधींच्या हत्येमागे सूत्रधार स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. नथुराम गोडसे यांची तुलना भगवान विष्णूशी केली गेली आहे. देशाच्या फाळणीसाठी हिंदू महासभा जबाबदार आहे असे दाखविण्यात आल्याचा आरोप सावरकरप्रेमींनी केला आहे.
या संदर्भात सावरकरप्रेमी उत्कर्ष गीते यांनी आरोप केला आहे की, "मी पण नथुराम गोडसेच बोलतोय या नाटकात नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर भारताबरोबर जो झालेला अन्याय याच्या इतिहासाची एकदम चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आपला हा जो नैतिक समाज आहे. आपल्या समाजात काय घडतंय काय नाही हे आपण पाहायला पाहिजे. एखादी चुकीची गोष्ट ही समाजामध्ये कलेच्याद्वारे दाखवली गेली असेल तर ते समाजाने सत्य पकडू नये. आणि ज्या दिग्दर्शकांनी ही स्पर्धा लिहीली त्यांनी नाटकाच्या आधी सांगायला पाहिजे की याचा इतिहासाशी काही संबंध नाहीये". असे म्हटले आहे. तसेच, इतिहासाची चुकीची पुनरावृत्ती करण्याचा हा जो प्रयत्न सुरु आहे. हा त्वरित थांबविण्यात यावा अशी माझी मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणी सावरकरप्रेमी हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर, आम्ही नाटकाची स्क्रिप्ट ही सेन्सॉर करून घेतली आहे. एवढंच नाही तर नाटकाचा प्रयोग सादर करत सर्व नियमांचे पालन केल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे.
अहमदनगरच्या स्वराज्य प्रतिष्ठानने राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या नाटकांमध्ये दाखवण्यात आलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केल्यानंतर नथुराम गोडसेला पश्चाताप झाल्याचा प्रसंग दाखविण्यात आल्यानेच या नाटकाला विरोध होत असल्याचे म्हणत काँगेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटलं आहे. सोबतच नाटकाच्या प्रयोगावेळी गोंधळ घालणाऱ्यावर कारवाईची मागणीही केली आहे. दरम्यान, शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नाट्यस्पर्धेत असा प्रकार घडल्याने दिवसभर यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Ameya Khopkar: 'कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर...'; अमेय खोपकर यांचा इशारा