एक्स्प्लोर
Advertisement
शनाया 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका सोडणार!
एरव्ही कलाकार एखाद्या बड्या प्रोजेक्टसाठी मालिका सोडतात, पण रसिका तसं करत नाही.
मुंबई : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच रसिका सुनील आता या मालिकेमध्ये कुछ दिनों की मेहमान है आणि यावेळी ही चर्चा नाही तर रसिका खरंच ही मालिका सोडणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या सेटवर रसिका आता फक्त चार दिवस शूटिंग करुन मालिकेचा निरोप घेणार आहे.
एरव्ही कलाकार एखाद्या बड्या प्रोजेक्टसाठी मालिका सोडतात, पण रसिका तसं करत नाही. नवा सिनेमा किंवा नाटकासाठी नाही तर परदेशात फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रसिकाने मागील वर्षी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. यंदा तिला यासाठी प्रवेश मिळाला आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून मालिकेतून जर शनायाने एक्झिट घेतली तर काय करायचं असा प्रश्न निर्मात्यांसमोर उभा राहिला आहे. पण शो मस्ट गो ऑन...नव्या शनायाचा शोध सुद्धा सुरु आहे. शनाया म्हणजेच रसिका भारतातच नसणार म्हटल्यावर ती तिच्या आगामी सिनेमा 'गेट मेट'च्या प्रमोशनलाही अॅबसेन्ट असेल. पण तिच्यासाठी मात्र हा गोल्डन शेक हॅन्ड आहे, नवीन काहीतरी शिकून जेव्हा रसिका परत येईल तेव्हा तिच्याकडे नक्कीच काहीतरी खास असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement