Masterchef India Season 7: तीन मुलांना गमावले, तरीही मानली नाही हार; असा आहे 78 वर्षाच्या 'उर्मिला बा' यांचा मास्टरशेफपर्यंतचा प्रवास
उर्मिला जमनादास आशर (Urmila Jamnadas Asher) या मास्टरशेफ इंडिया या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्यांनी परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली.

Masterchef India Season 7: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम मास्टरशेफ इंडिया सीजन 7 (Masterchef India Season 7) मध्ये मुंबईच्या 78 वर्षीय उर्मिला जमनादास आशर (Urmila Jamnadas Asher) या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या. उर्मिला या मास्टर शेफ इंडियामध्ये (Masterchef India Season 7) सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या. उर्मिला जमनादास आशर (Urmila Jamnadas Asher) या मास्टरशेफ इंडिया या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्यांनी परीक्षकांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. उर्मिला यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. 203 घरात स्वयपाकाचं काम त्या करत होत्या. आज त्या एक व्यावसायिक महिला आहेत. उर्मिला यांनी त्यांच्या पतीला आणि मुलांना गमावले. तरी त्यांनी हार मानली नाही.
उर्मिला यांना लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लगला. त्यामुळे त्यांनी नातू हर्ष सोबत 2020 मध्ये (गुज्जू बेन नास्ता) नावाने स्वतःचे YouTube चॅनल सुरू केले. ज्यामध्ये त्या अनेक पदार्थांच्या रेसिपी सांगातात.
तीन मुलांना गमावलं
उर्मिला यांच्या अडीच वर्षांच्या मुलीचं तिसऱ्या मजल्यावरून पडून निधनं झालं, त्यांच्या एका मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि अगदी लहान वयात त्यानं जगाचा निरोप घेतला. त्यानंतर दुसऱ्या मुलाचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी उर्मिला या मास्टरशेफमधून आऊट झाल्या. मास्टरशेफमधून आऊट झाल्यानंतर उर्मिला यांनी सोशळ मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी लिहिलं, 'या शोमुळे मित्र बनवले जे आता माझ्या कुटुंबाचा भाग झाले आहेत. सर्वांसोबत घालवलेला वेळ माझ्या कायम स्मरणात राहील.'
View this post on Instagram
उर्मिला यांनी 2020 मध्ये (गुज्जू बेन नास्ता) नावाने स्वतःचे YouTube चॅनल सुरू केले, ज्यामध्ये त्या अनेक पदार्थांच्या रेसिपी सांगातात. या चॅनलवर त्यांचे अनेक फॉलोअर्सही आहेत. त्यांचे गुज्जू बेन ना नास्ता नावाचे इन्स्टाग्राम खात्यावर देखील आहे. त्यांच्या या अकाऊंटला 28 हजारपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
