Marathi Serials : प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी; 'तू माझा सांगाती' अन् 'जीव झाला येडापिसा' गाजलेल्या मालिका पुन्हा पाहता येणार
Marathi Serials : 'तू माझा सांगाती' आणि 'जीव झाला येडापिसा' या जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत.
Marathi Serials : छोट्या पडद्यावर विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका (Marathi Serials) सुरू आहेत. नव्या मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण जुन्या मालिकांची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. मालिकाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'तू माझा सांगाती' (Tu Majha Sangati) आणि 'जीव झाला येडापिसा' (Jeev Zhala Yeda Pisa) या मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत.
'तू माझा सांगती' अन् 'जीव झाला येडापिसा' मालिका पुन्हा पाहायला मिळणार
प्रेक्षकांनी ज्या मालिकांवर भरभरून प्रेम केलं, त्या मालिका आता पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'तू माझा सांगाती' व 'जीव झाला येडापिसा' या दोन लोकप्रिय मालिका आजपासून कलर्स मराठीवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक पुन्हा एकदा या मालिकांच्या मनमोहक कथनांमध्ये मग्न होतील.
‘तू माझा सांगाती’ (Tu Majha Saangaati), संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकथेचा प्रवास व ‘जीव झाला येडापिसा’ (Jeev Zala Yedapisa), शिवा आणि सिद्धी यांची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आजपासून सकाळी 9.00 वा. ‘तू माझा सांगाती’ व सकाळी 11.00 वा. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिका पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा या मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एकीकडे नव्या मालिकांसह जुन्या मालिकाही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
तू माझा सांगाती (Tu Majha Saangaati ): 'तू माझा सांगाती' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात संत तुकारामांची भूमिका साकारली आहे. तर ऋतुजा देशमुखने आवलीची भूमिका साकारली होती. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोयराची भूमिका वठवली होती.
View this post on Instagram
जीव झाला येडापिसा (Jeev Zala Yedapisa) : जीव झाला येडापिसा ही रोमँटिक मालिका होती. या नाट्यमय मालिकेचं लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं होतं. तर विनोद लवेकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.
संबंधित बातम्या