Marathi Serial Updates Satvya Mulichi Satvi Mulgi : शेखर राजाध्यक्ष विरोचकाच्या बाजूने की नेत्रासोबत? 'सातव्या मुलीची...'मध्ये आलाय नवा ट्वीस्ट
Marathi Serial Updates Saatvya Mulichi Saatvi Mulgi : शेखर राजाध्यक्षही रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत आहे. मात्र, शेखर नेमकं कोणत्या बाजूने आहे, यावर मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.
Marathi Serial Updates Satvya Mulichi Satvi Mulgi : छोट्या पडद्यावर सध्या चांगलीच टीआरपीची स्पर्धा सुरू आहे. 'झी मराठी'वरील (Zee Marathi) ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Saatvi Mulgi) या मालिकेतही मागील काही दिवसांपासून नाट्यमय वळणं आली आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर आता त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे दिसत आहे. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकू आणि फाल्गुनी यांना संमोहित केले असून आपल्या बाजूने वळवले आहे. आता शेखर राजाध्यक्षही रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत आहे. मात्र, शेखर नेमकं कोणत्या बाजूने आहे, यावर मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.
नेत्राने रागाच्या भरात रुपालीचा वध केल्यानंतरही ती जिवंत होते आणि विरोचक तिला नवी शक्ती देतो. या नव्या शक्तीमुळे राजाध्यक्ष कुटुंबावर नवं संकट आले असून नेमकं काय होतंय हे नेत्रालाही कळतं नाही. घरातले सगळे चर्चा करत असताना कुटुंबातील सदस्यांना शेखर रुपाली संमोहित करत असल्याचे सांगतो.
शेखर सांगतो की, “रुपाली तन्मयच्या डोळ्यांत बघून त्याला संमोहित करत होती. पण मी शेवटच्या क्षणी त्याचं लक्ष विचलित करुन त्याला पाठवून दिले. घरात आलेल्या पोलिसांच्याही डोळ्यांत बघून ती त्यांना संमोहित करण्याचा प्रयत्न करत होती. पण मी त्याला सुद्धा वेळीच सावध केले, नाहीतर त्याची अवस्थाही तशीच झाली असती.” असे सांगतो. शेखर रुपालीच्या गोटात जाऊन तिचा प्लान बाहेर काढण्याचा प्रयत्न करुयात असे सुचवतो. नेत्रा, इंद्रायणी, आदित्य त्यासाठी तयार होतात.
View this post on Instagram
शेखर रुपालीच्या आदेशावरून अद्वैतच्या कानशिलात लगावणार...
शेखर राजाध्यक्ष रुपालीच्या आदेशावर सगळ्यांच्या समोर अद्वैतच्या कानशिलात लगावतो. हे पाहून तेजस संतापतो. सगळेजण त्याला रुममध्ये नेऊन समजावतात आणि शेखर नाटक करत असल्याचे सांगतात. पण, शेखरचा हा डाव आहे, का? शेखर नेत्राला गाफील ठेवत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण शेखर कोणाच्या बाजूने?
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत शेखर राजाध्यक्षामुळे नवा ट्वीस्ट आला आहे. शेखरचे वागणं संशयास्पद आहे. त्यामुळे तो नेत्राच्या बाजूने आहे की रुपालीच्या बाजूने आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. नेत्रा, इंद्रायणी आणि अद्वैत वगळता इतर सगळेजण विरोचकाच्या बाजूने गेल्यानंतर शेखर कोणाच्या बाजूने आहे यावरून पडदा उघडणार असल्याची शक्यता आहे. एका प्रोमोमध्ये रुपाली नेत्राला आव्हान देताना माझ्यासोबत घरातील सगळेजण असल्याचे सांगते. रुपालीच्या या शक्तीविरुद्ध त्रिनयना देवी आईच्या लेकी कशा लढणार, हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.