Marathi Serial Updates Paaru Home Minister Episode : अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या चरणी पारू आणि आदित्य; भावोजींसोबत रंगला 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग
Marathi Serial Updates Paaru Home Minister Episode : स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग रंगणार आहे.
Marathi Serial Updates Paaru Home Minister Episode : छोट्या पडद्यावर सध्या 'झी मराठी'वरील 'पारू' (Paaru) मालिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. या मालिकेत सध्या नवीन वळण आले आहे. पारूच्या आयुष्यात आणखी घडामोडी घडणार आहेत. मालिकेत आता लग्न सराई विशेष भाग सुरू होणार आहे. या लग्न सराई भागाशी निगडीत असलेला विशेष भाग 'होम मिनिस्टर'मध्ये दिसणार आहे. स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये पारू आणि आदित्यसोबत 'होम मिनिस्टरचा' विशेष भाग रंगणार आहे.
'झी मराठी वाहिनी'ने मराठी प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवत कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे. आता प्रेक्षकांसोबतचे नातं आणखी दृढ करण्यासाठी 'झी मराठी' एका नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. 27 मे रोजी 'झी मराठी' नव्या रुपात प्रेक्षकांना भेटणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शन घेतले. यावेळी स्वामींच्या मंदिरात 30 हजार सोनचाफ्यांच्या फुलांची आरास करण्यात आली होती. आदेश बांदेकर आणि पारू टीमने मिळून स्वामींची आरती करून स्वामींपुढे नवीन वाटचालीसाठी प्रार्थना केली आणि आशिर्वाद घेतले.
आदेश बांदेकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, "खरंतर अक्कलकोट पुण्यभूमी आहे. या वातावरणात चैतन्य अनुभवत असताना बहरणाऱ्या नात्यांच्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये 'होम मिनिस्टर'च्या माध्यमातून मी अनेक वर्ष अक्कलकोटला जात आहे. पण ह्यावेळी स्वामींच्या मंदिरात त्यांना आवडणाऱ्या सोनचाफ्याच्या फुलांची आरास झी मराठीने केली. यासाठी 30,000 सोनचाफ्याची फुलं वापरण्यात आली. ती आरास अनुभवत असताना एक वेगळंच चैतन्य होतं असे आदेश बांदेकर यांनी सांगितले.
आदेश बांदेकर यांच्यासोबत यावेळी 'पारू' मालिकेतील पारू आणि आदित्य देखील उपस्थित होते. 'पारू' म्हणजेच शरयू सोनावणेने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले," मी झी मराठीचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे मला अक्कलकोटला जायची संधी मिळाली आणि स्वामींच्या पादुकांना स्पर्श करायला मिळाले. चाफ्याच्या फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट पाहून डोळे दिपून गेले होते. ह्यासोबतच 'होम मिनिस्टर' मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. स्वामी समर्थांची आरती केल्यानंतर 'होम मिनिस्टर' आणि टीमने अन्नछत्रमध्ये गेले होते. त्या ठिकाणी भाविकांनी शुभेच्छा दिल्या.
पारू आणि आदित्यसोबत 'होम मिनिस्टरचा' खेळ अक्कलकोटमध्ये पार पडला. या विशेष भागात अनेक किस्से आणि धम्माल मज्जा मस्ती झाली. श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधील हा होम मिनिस्टरचा ‘पारू’ विशेष भाग 27 मे सायंकाळी 6.30 वाजता 'झी मराठी'वर प्रसारीत करण्यात येणार आहे.