एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aai Tulja Bhawani Marathi Serial : महाराष्ट्राच्या 'कुलस्वामिनी'ची गाथा छोट्या पडद्यावर;'आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री
Aai Tulja Bhawani Marathi Serial : कलर्स मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा उलगडणार आहे. या मालिकेतून पूजा मालिका विश्वात पदार्पण करत आहे.
Aai Tulja Bhawani Marathi Serial : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यासाठी चॅनेल्सकडून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जात आहेत. टीआरपीच्या शर्यतीत पुन्हा आघाडीवर येण्यासाठी 'कलर्स मराठी'ने चांगलीच कंबर कसली आहे. छोट्या पडद्यावर आध्यात्मिक – धार्मिक मालिका याआधी देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत. आता कलर्स मराठी वाहिनीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा उलगडणार आहे. या मालिकेतून पूजा मालिका विश्वात पदार्पण करत आहे.
मागील काही वर्षांपासून यशस्वीपणे धार्मिक – आध्यात्मिक मालिका सातत्याने देणाऱ्या कलर्स वाहिनीने आता एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. 'आई तुळजाभवानी'ची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारणार आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केले आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतले आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेची चर्चा सुरू आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोत लेकरांच्या हाकेला त्वरित धावून भूतलावर अवतरणाऱ्या 'आई तुळजाभवानी'चं अद्भुत,अलौकिक रूप त्यात पाहायला मिळत आहे. दुर्जनांचा कळीकाळ ठरलेल्या मातेच्या रौद्ररुपाचे, एका हाकेवर उभ्या ठाकणाऱ्या आदिमायेच्या अष्टभुज रुपाचे भव्य दर्शन दिसून आले आहे.
View this post on Instagram
आई तुळजाभवानीची भूमिका साकारताना...
'आई तुळजाभवानी' मालिकेतल्या मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळे म्हणाली,"आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. मालिकेची संपूर्ण अनुभवी टीम आणि तिचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मार्गदर्शनाने 'आई तुळजाभवानी' ही भूमिका मनापासून साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन असा विश्वास पूजाने व्यक्त केला.
इतर महत्त्वाची बातमी :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
Advertisement