Maharashtra Television News : 'खतरों के खिलाडी' ते 'शेतकरीच नवरा हवा'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता'च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली,"सत्याचा विजय होतो"
Jennifer Mistry On Asit Modi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालाने (Jennifer Mistry) 14 वर्षांनंतर ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर तिने गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shetkarich Navra Hava : सया आणि रेवाच्या लग्नाचा बार उडणार; शेतकरी मुलाला नवरी मिळणार!
Shetkarich Navra Hava : 'शेतकरीच नवरा हवा' (Shetkarich Navra Hava) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ही मालिका रोमॅंटिक वळणावर आली आहे. या मालिकेत आता सया आणि रेवाच्या लग्नाचा बार उडणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Khatron Ke Khiladi 13: 'खतरों के खिलाडी'मध्ये कोणाचं मानधन सर्वात जास्त? शिव ठाकरे आणि डेजी शाहा यांच्यात स्पर्धा
Khatron Ke Khiladi 13: 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke khiladi) हा छोट्या पडद्यावरील धमाकेदार रिअॅलिटी शो आहे. खतरों के खिलाडीचे 13 वे (Season 13) पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. 'जय हो' आणि 'रेस 3' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री 'डेजी शाहा' ही देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच ती या स्पर्धेतील सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक असल्यांच म्हटलं जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serial : थोडक्यात मागे पडली 'आई कुठे काय करते' अन्...; 'TRP'च्या शर्यतीत 'ठरलं तर मग' अव्वल
Marathi Serial Trp Rating Latest Update : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत साजरा केला 'मदर्स डे'
Pratishodh Zunj Astitvachi Mother's Day 2023 Special : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही मालिका आई आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. आता या मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे' (Mothers Day 2023) साजरा केला आहे.