एक्स्प्लोर

स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल

सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेत पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग

मुंबई : मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे. अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असेल.

स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल

‘आई कुठे काय करते’ मालिकेत यावर्षीही होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पुजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पुजेत संजनाला देखील सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अश्या वागण्याने अरुंधती दुखावली जाते. देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का हे मालिकेच्या 28 मार्चच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचं मळभ आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील असं वाटत असतानाच दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.

स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल

फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही शुभम-कीर्तीच्या नात्यात दुरावा आला आहे. ऐन सणाच्या दिवशीही शुभम कीर्तीकडून रंग लावून घेत नाही. शुभमचं हे वागणं कीर्तीला खटकतं. शुभमच्या अश्या वागण्याचं कारण कीर्तीला कळेल का? दोघांमधील हा दुरावा आणखी किती काळ रहाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. होळीच्या निमित्ताने शुभम-कीर्तीवर एक रोमॅण्टिक गाणं देखिल चित्रित करण्यात आलं आहे. एकंदरीतचं काय तर कोरोनामुळे वैतागलेल्या प्रेक्षकांना स्टार प्रवाह या होळीच्या सणाला चांगलेच मनोरंजन करणार आहे.

स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये होळीच्या सणाची धमाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
Embed widget