एक्स्प्लोर

Telly Masala : टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग'ने मारली बाजी ते 'आत्मपॅम्फ्लेट'चा टीझर रिलीज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Gashmeer Mahajani: वडिलांच्या निधनानंतर केस कापण्याबद्दल चाहत्यानं विचारला प्रश्न; गश्मीर उत्तर देत म्हणाला, 'मी जर टक्कल केले असते तर...'

Gashmeer Mahajani:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. गश्मीर हा इन्स्टाग्रामवरील  ‘आस्क गश फॉर अ मिनिट्स’ (Ask Gash for A few minutes) या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. नुकतेच काही नेटकऱ्यांनी गश्मीर महाजनीला काही प्रश्न विचारले या प्रश्नांना गश्मीरनं दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aatmapamphlet Official Teaser: वाळवीनंतर परेश मोकाशीचा 'आत्मपॅम्फ्लेट' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; भन्नाट टीझर रिलीज

Aatmapamphlet Official Teaser: परेश मोकाशीच्या (Paresh Mokashi) वाळवी (Vaalvi) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वाळवीनंतर परेश मोकाशीचा  'आत्मपॅम्फ्लेट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निवड 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nana Patekar : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा"

Nana Patekar On Sudhir Mungantiwar Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : महान योद्धे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडनमध्ये असणारी वाघनखे (Wagh Nakh) लवकरच भारतात आणण्यात येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वत: वाघनखे आणायला लंडनला जाणार आहेत. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना डिवलचं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Priya Bapat : मोदकावर ताव मारायचा अन् सकाळी उठून चालायला जायचं; प्रिया बापटचा गणेशोत्सवादरम्यानचा फिटनेस फंडा

Priya Bapat On Kalavantancha Ganesh : मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या 'जर तरची गोष्ट' या नाटकामुळे चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्रीने गणेशोत्सवादरम्यान भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना तिने गणेशोत्सवादरम्यानचा (Ganeshotsav 2023) तिचा फिटनेस फंडा शेअर केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tharla Tar Mag : छोट्या पडद्यावर जुई गडकरीचं राज्य! 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या TRP Report...

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maha Civic Polls: राज्यातील रखडलेल्या निवडणुका जाहीर, २ डिसेंबरला मतदान
Polls Without VVPAT: ‘या निवडणुकीमध्ये VVPAT चा वापर करणार नाही’, निवडणूक आयोगाची घोषणा
Voter List Row: मतदार यादीत दुबार नावांचा गोंधळ, जबाबदारी कुणाची?
Voter List Row: मतदार यादीतील गोंधळावर आयोगाचं थेट उत्तर
Maha Civic Polls: स्थानिक निवडणुकांचा मुहूर्त ठरला, २ डिसेंबरला मतदान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार, निवडणुका जाहीर होताच मिटकरींनी व्यक्त केला विश्वास  
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
मोठी बातमी : 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? संपूर्ण टाईमटेबल
Ramraje Nimbalkar on Ranjitsinh Nimbalkar: दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का? रामराजेंनी रणजितसिंह निंबाळकरांचं सगळंच काढलं
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
पुणे हादरलं, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय युवकाचा खून; 3 दिवसात दुसरी घटना
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
Sharad Pawar : राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही; शरद पवारांची आशिष शेलारांवर टीका
Embed widget