Telly Masala : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ते आरती सोळंकीचं ट्रान्सफॉर्मेशन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
![Telly Masala : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ते आरती सोळंकीचं ट्रान्सफॉर्मेशन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... marathi movie telly masala marathi serial latest update Shivrayancha Chhava Movie Record Marathi Serial TRP Rating Tharla tar Mag Aarti Solanki Transformation Isha Keskar Milind Gawali Telly Masala : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' ते आरती सोळंकीचं ट्रान्सफॉर्मेशन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/14/eb44ca73e37d909cf7d0169f2c4ff4a91697276796736254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' सिनेमाने रिलीजआधीच रचला इतिहास! 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला मराठी सिनेमा
Shivrayancha Chhava : 'फर्जंद' (Farzand), 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast), 'पावनखिंड' (Pawankhind), 'शेर शिवराज' (Sher Shivraj) आणि 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाने रिलीजआधीच इतिहास रचला आहे. न्ययॉर्कयेथील टाईम्स स्क्वेअरवर या सिनेमाचं पोस्टर झळकलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serials : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' महाराष्ट्रात नंबर 1 मालिका
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aarti Solanki : "सहकलाकारांनी छक्का म्हणून हिणवलं"; अभिनेत्री आरती सोळंकीने घटवलं तब्बल 50 किलो वजन...जाणून घ्या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास...
Aarti Solanki : अभिनेत्री आरती सोळंकी (Aarti Solanki) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये चर्चेत नसून तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. आरतीने 5-10 किलो नव्हे तर तब्बल 50 किलो वजन घटवलं आहे. आरतीचे ट्रान्सफॉर्मेशननंतरचे (Aarti Solanki Transformation) फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Isha Keskar : 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर छोटा पडदा गाजवायला इशा केसकर सज्ज; 'या' मालिकेतून करणार दमदार कमबॅक
Isha Keskar : गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Laxmichya Paulanni) ही नवी मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून इशा केसकर (Isha Keskar) दमदार कमबॅक करणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर छोट्या पडद्या गाजवायला इशा सज्ज आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Milind Gawali : 'कुठलाही पोलिसवाला कधीही पैसे खात नाही'; 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत!
Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत अभिनेता मिलिंद गवळी अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. आता मिलिंद गवळी यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिरुद्धच्या वागणुकीचं कौतुक केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)