(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aarti Solanki : "सहकलाकारांनी छक्का म्हणून हिणवलं"; अभिनेत्री आरती सोळंकीने घटवलं तब्बल 50 किलो वजन...जाणून घ्या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास...
Aarti Solanki : अभिनेत्री आरती सोळंकीला सहकलाकारांनी छक्का म्हणून हिणवलं आहे.
Aarti Solanki : अभिनेत्री आरती सोळंकी (Aarti Solanki) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये चर्चेत नसून तिच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. आरतीने 5-10 किलो नव्हे तर तब्बल 50 किलो वजन घटवलं आहे. आरतीचे ट्रान्सफॉर्मेशननंतरचे (Aarti Solanki Transformation) फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
आरतीचं वजन 132 होतं. आता तिने 50 किलो वजन घटवलं आहे. डाएट आणि नियमित व्यायाम करून अभिनेत्रीने वजन कमी केलं आहे. या प्रवासाबद्दल अल्ट्रा बझ मराठीला दिलेल्या मुलाखतीत आरती म्हणाली,"डिसेंबर २०२२ मध्ये मी एका रियालिटी शोच्या शूटला गेले होते. तिथे एका महिला सहकलाकाराने मला छक्का म्हणतं हिणवलं होतं. एक स्लोगन होतं. मी एका बाजूला उभी होते आणि बाकिच्या सगळ्या एका बाजूला आणि छक्का म्हणलं की त्या सगळ्या माझ्याकडे हात करायच्या. मी पण त्या फ्लोमध्ये होते. पण त्यानंतर दिवसभर त्यांनी मला कळावं यासाठी ज्यापद्धतीने छक्का म्हणतं मला हिणवलं होतं त्याचा मला खूप त्रास झाला".
आरती पुढे म्हणाली,"त्यानंतर कसतरी दिवसभर मी ते शूट केलं. मला ते छक्का म्हणाले याचा राग नाही आला. मला त्यांची वृत्ती खटकली. पण मी काहीच करु शकत नव्हते याच मला प्रचंड वाईट वाटतं होतं. त्यानंतर मी ठरवलं की त्यांच्यासाठी नाही तर स्वत:साठी वजन कमी करायचं".
आरती म्हणते,"वजन कमी केल्यावर मला स्वत:ला आता काहीही वेगळं वाटत नाही. पण आता ज्याप्रकारे माझं कौतुक केलं जातंय, माझी दखल घेतली जातेय. मी ५० किलो वजन कमी केलंय. मला जेव्हा समोरुन लोक सांगतात की तू खूप छान दिसतेस, खूप फिट वाटतेस, त्यानंतर आता मला मी काहीतरी बदलले आहे, असं वाटतंय. मला स्वत:ला काहीही जाणवत नाही. मी आता हल्ली आरशात उभं राहून स्वत:ला नीट पाहते. मी आधीचे फोटो आताचे फोटो पाहते. याबरोबरच कपडेही प्रचंड सैल झाले आहेत. मी जवळपास 20 ते 22 इंच कमी झाले आहे".
आरतीचं डाएट काय आहे? (Aarti Solanki Diet)
नियमित वर्कआऊट करणे, दररोज सात ते आठ तास चालणे आणि दिवसाला 40 हजार पावलं चालणे आणि योग्य डाएट करुन आरतीने वजन कमी केलं आहे. डाएटमध्ये ती सकाळी नाष्टा आणि दुपारी एक भाकरी आणि भाजी खाते. तसेच रात्री झोपताना ती दूध पिते.
संबंधित बातम्या