एक्स्प्लोर

Telly Masala : ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट ते सायली अन् ऋषी 'या' सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मध्ये नवा ट्विस्ट; 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची होणार मालिकेत एन्ट्री

Tuzech Mi Geet Gaat Aahe: छोट्या पडद्यावरील   ‘तुझेच मी गीत गात आहे’  (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  ही प्रसिद्ध मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. वैदेहीप्रमाणे हुबेहुब दिसणारी मंजुळा ही वैदेही नसून मंजुळाच असल्याचं सत्य मोनिकासमोर येणार आहे. रागाच्या भरात टोकाची भूमिका घेणाऱ्या मोनिकाची समजूत काढायची कशी हा मोठा प्रश्न मल्हारसमोर आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रिन; आगामी प्रोजेक्टची केली घोषणा

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता नवाजुद्दीन हा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब अन् निमिष कुलकर्णीच्या अफेअरच्या चर्चा; लवली म्हणते,"आमचं नातं"

Shivali Parab Nimish Kulkarni Dating Gossips : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. कार्यक्रमासह त्यातील विनोदवीरदेखील चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी हास्यजत्रेतील लवली अर्थात शिवाली परब (Shivali Parab) आणि अभिनेता निमिष कुलकर्णीच्या (Nimish Kulkarni) डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sayali Sanjeev : 'काहे दिया परेदस' मालिकेतील शिव-गौरीची जोडी पुन्हा एकत्र दिसणार; सायली संजीव अन् ऋषी सक्सेना 'या' सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत

Sayali Sanjeev Rishi Saxena New Marathi Movie : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये 'काहे दिया परदेस' (Kahe Diya Pardes) या मालिकेचा समावेश होतो. ही मालिका चांगलीच गाजली होती. कथानकासह या मालिकेतील पात्रांनाही प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवली. मालिकेतील गौरी आणि शिवची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेनंतर त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. 'समसारा' या सिनेमात सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि ऋषी सक्सेना (Rishi Saxena) एकत्र दिसणार आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo : नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही.. अमृता-प्रसादच्या लग्नाचा शाही थाट; पाहा फोटो

Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo : अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 18 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget