Telly Masala : 'नाळ-2'चं मराठी कलाकारांनी केलं कौतुक ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकर यांना जाहीर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Naal 2 : "भावा-बहिणीनं एकत्र पहावा, असा सिनेमा!"; नाळ-2 चित्रपटाचं मराठी कलाकारांनी केलं तोंडभरुन कौतुक
Naal 2 Review: नाळ-2 (Naal 2) हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक खास स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. नाळ-2 या चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडल्यानंतर अनेक कलाकारांनी या चित्रपटाच भरभरुन कौतुक केलं आहे. हा चित्रपट दिवाळीत आपल्या भावा-बहिणीसोबत नक्की बघा, असं अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Yogesh Shirsat: "माझ्या वडिलांनी जेव्हा मला परफॉर्म करताना पाहिलं, तेव्हा त्यांचा डोळा..."; चला हवा येऊ द्या फेम अभिनेता योगेश शिरसाट सांगितलेली घटना
Yogesh Shirsat: छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. अभिनेता योगेश शिरसाट (Yogesh Shirsat) देखील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात विविध भूमिका साकारतो. योगेशनं महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत देखील सहभाग घेतला. योगेशनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं तेव्हा आईनं विरोध केला नाही पण वडील म्हणत होते की, माझे मित्र मला सांगतात की, माझा मुलगा वकिली करतो, माझा मुलगा इंजिनिअर आहे, मग मी त्यांना काय सांगू? ते तेव्हा तसं म्हणत होते, कारण मी तेव्हा काहीच करत नव्हतो." मुलाखतीमध्ये योगेशनं त्याच्या वडिलांबाबत सांगितलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: देशभरात उत्साहात दिवळी (Diwali 2023) साजरी केली जात आहे. दिवळीमध्ये अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत असतात. अशातच दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Lata Mangeshkar Award: 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर
Lata Mangeshkar Award: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी ट्वीट शेअर करुन पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award 2023) हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा