Yogesh Shirsat: "माझ्या वडिलांनी जेव्हा मला परफॉर्म करताना पाहिलं, तेव्हा त्यांचा डोळा..."; चला हवा येऊ द्या फेम अभिनेता योगेश शिरसाट सांगितलेली घटना
Yogesh Shirsat: अभिनेता योगेश शिरसाट (Yogesh Shirsat) देखील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात विविध भूमिका साकारतो. एका मुलाखतीमध्ये योगेशनं त्याच्या वडिलांबाबत सांगितलं.
Yogesh Shirsat: छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. अभिनेता योगेश शिरसाट (Yogesh Shirsat) देखील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात विविध भूमिका साकारतो. योगेशनं महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेत देखील सहभाग घेतला. योगेशनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं तेव्हा आईनं विरोध केला नाही पण वडील म्हणत होते की, माझे मित्र मला सांगतात की, माझा मुलगा वकिली करतो, माझा मुलगा इंजिनिअर आहे, मग मी त्यांना काय सांगू? ते तेव्हा तसं म्हणत होते, कारण मी तेव्हा काहीच करत नव्हतो." मुलाखतीमध्ये योगेशनं त्याच्या वडिलांबाबत सांगितलं.
'महाराष्ट्राचा सुपरस्टार' स्पर्धेत घेतला भाग
योगेशनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "2009 मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार ही स्पर्धा आली. ज्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा ऑडिशन दिली. त्यानंतर मी त्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले, मग मी संभाजीनगरमधून मुंबईत आलो. "
वडील झाले पॅरेलाइज
पुढे योगेशनं सांगितलं, "मी एकदा माझ्या वडिलांना सांगितलं की, माझं काम वाढलं आहे. त्यामुळे मला संभाजीनगर सोडून मुंबईत यावं लागेल. हे ऐकल्यानंतर त्यांना टेंशन आलं. त्यांचा बिपी वाढला. तेव्हा ते पॅरेलाईज झाले. त्यांचा एक डोळ्याचं बुबुळ हालले होते."
योगेश म्हणाला, "मी माझ्या वडिलांना मुंबईमध्ये घेऊन आलो. तेव्हा एकदा ते माझा परफॉर्मन्स बघायला आले. त्यादिवशी काय चमत्कार झाला माहित नाही. मी स्टेजवर परफॉर्म करत असताना तेव्हा त्यांच्या डोळ्याचं बुबुळ जागेवर आलं आणि ते रिकव्हर झाले."
पहिला परफॉर्मन्स
मुलाखतीमध्ये योगेशनं त्याच्या पहिला परफॉर्मन्सबद्दल देखील सांगितलं. तो म्हणाला, "मी सातवीत असताना आमच्या शाळेत विनोद कथन स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी परफॉर्म केलं होतं. मला तेव्हा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं होतं."
View this post on Instagram
संबंधित बातम्या: