Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Serials : 'कुन्या राजाची गं तू रानी' ते 'सारेगमप लिटील चॅम्प्स'; छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Marathi Serials : मालिकाविश्वात (Marathi Serials) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'कुन्या राजाची गं तू रानी' (Kunya Rajachi Ga Tu Rani) , 'सिंधुताई माझी माई' (Sindhutai Mazi Mai) तसेच 'सारेगमप लिटील चॅम्प्स' सारखा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एकंदरीत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rohini Hattangadi: रोहिणी हट्टंगडी यांनी साकारल्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका; म्हणाल्या, 'जितेंद्र, धर्मेंद्र, अमितजी हे माझ्यापेक्षा मोठे...'
Rohini Hattangadi: अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे. रोहिणी हट्टंगडी या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतात. अनेक चित्रपटांमध्ये रोहिणी हट्टंगडी यांनी आईची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीमध्ये रोहिणी यांनी त्यांच्या भूमिकेबाबत सांगितलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ashwini Bhave: कधी 'बनवाबनवी'मधील मॅडम तर कधी 'राऊ' मधील मस्तानी होऊन जिंकली प्रेक्षकांची मनं; लग्नानंतर परदेशात झाली सेटल, जाणून घ्या अश्विनी भावेची लव्ह स्टोरी...
Ashwini Bhave: अभिनेत्री अश्विनी भावेनं (Ashwini Bhave) आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी चित्रपटांबरोबच हिंदी चित्रपटांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं. अश्विनीच्या अशीही बनवाबनवी या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जाणून घेऊयात अश्विनीच्या बालपणाबद्दल...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमोनं वेधलं लक्ष
Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. अनेक अनाथांच्या त्या आई झाल्या. गेल्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. सिंधुताईंना त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडथळींचा सामना करावा लागला होता. आता सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावरील एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात येणार आहे. “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' मालिकेची टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; सायली अन् अर्जुनने घेतलं बाप्पाचं दर्शन
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही या मालिकेने बाजी मारली आहे. आता या मालिकेचे 200 भाग पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने या मालिकेच्या टीमने मुंबईतील सिद्धिविनायकाच्या मंदिरात (Siddhivinayak Ganapati Mandir) जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.