Ashwini Bhave: अभिनेत्री अश्विनी भावेनं (Ashwini Bhave) आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठी चित्रपटांबरोबच हिंदी चित्रपटांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं. अश्विनीच्या अशीही बनवाबनवी या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जाणून घेऊयात अश्विनीच्या बालपणाबद्दल...


बालपणीमध्ये अश्विनी भावेनं एका मुलाखतीमध्ये  सांगितलं,'शाळेमध्ये मी गीतापठण, वक्तृत्व स्पर्धा यामध्ये भाग घ्यायचे. शाळेत असताना  दहावीच्या सुट्टीमध्ये मी एका नाटकामध्ये काम केलं.'


एका मुलाखतीमध्ये राऊ मालिकेचा किस्सा अश्विनीनं सांगितला. ती म्हणाली, 'मला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. राऊ मालिकेचा एक प्रसंग मी सांगते, मी स्मिता ताईसोबत कळत नकळत या चित्रपटामध्ये काम केलं होतं. राऊ मालिकेची बांधणी स्मिताताई करत होती. तेव्हा त्या मालिकेसाठी स्मिता ताई माझा विचार करत होती. त्यावेळी एका व्यक्तीनं तिला सांगितलं, ही मुलगी मुस्लिम  कशी वाटणार? मला वाटत होतं त्या मालिकेत मला स्मिता ताईनं घ्यावं. म्हणून मी त्या भूमिकेचा आभ्यास केला आणि स्मिता ताईला पटवून दिलं की, मी ही भूमिका करु शकते.' राऊ मालिकेत अश्विनीनं मस्तानी ही भूमिका साकारली.


अश्विनी आणि किशोर यांची लव्ह स्टोरी


अश्विनीनं किशोर बोपर्डीकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अश्विनी अमेरिकेत सेटल झाली.अश्विनीनं तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं,
'आम्ही पहिल्यांदा बंधन या चित्रपटाच्या सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्या चित्रपटाचं शूटिंग हैद्राबादमध्ये  झालं होतं. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो.  आम्ही गप्पा मारायचो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा चित्रपटसृष्टीसोबत काहीही संबंध नव्हता.'






वासूची सासू, गगनभेदी आणि लग्नाची बेडी या नाटकांमध्ये अश्विनीनं काम केलं. तसेच मीरा का मोहन, ठण ठाण गोपाल,परंपरा, कायदा कानून या हिंदी चित्रपटांमध्ये तिनं काम केलं. सरकारनामा,आजचा दिवस माझा, अशी ही बनवाबनवी, एक रात्र मंतरलेली या मराठी चित्रपटांमधील अश्विनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’  या अश्विनीच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


महत्वाच्या बातम्या : 


 Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...