रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं,  'मी नेहमीच माझ्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली आहे. जितेंद्र, धर्मेंद्र, मिथुन, अमितजी हे सगळे अभिनेते माझ्यापेक्षा मोठे आहेत. बासु भट्टाचार्य यांना मी एकदा म्हणाले होते, मला सगळे आईची भूमिका देतात. तेव्हा मला बासुदा म्हणाले, रोहिणी तुला समजत नाहीये. तू आणि संजीव कुमार हे दोन व्यक्ती असे आहेत, जे वृद्ध व्यक्तींच्या भूमिकेसाठी ओळखले जात आहेत. '


रोहिणी हट्टंगडी पुढे म्हणाल्या 'अग्निपथ चित्रपटाच्या आधी मी ठरवलं होतं की मी आईची भूमिका साकारणार नाही. मी काही चित्रपटांना तेव्हा नकार पण दिला होता. मला खलनायिकेची भूमिका तरी द्या कोणी तरी, असा विचार मी करत होते. तेव्हा अग्निपथ चित्रपटाची मला ऑफर आली. तेव्हा मी त्या चित्रपटात काम करायला होकार दिला.'


अग्निपथ या चित्रपटात रोहिणी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांच्या भूमिकेचं नाव सुहासिनी चौहान असं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा "विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम दीनानाथ चौहान" हा डायलॉग प्रचंड गाजला.


सध्या रोहिणी हट्टंगडी यांच्या बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील रोहिणी हट्टंगडी यांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी बाईपण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, आयुष्यात फक्त समोरा समोर आल्यावर हाय हॅलो नमस्कार, या व्यतिरिक्त काही झालं नाही. कारण मनावर ती समोर आली की, दडपण असायचं. बरं ती तशी दडपण देणारी नाहीच. पण या आधी जी तीने कामं केला आहेत, त्याचा प्रभाव एवढा की, न मागता दडपण यायचं. गांधी, सारांश, चालबाज, अग्नीपथ... एका पेक्षा एक सरस भूमिका डोळ्यासमोरून सरकल्या, जेव्हा मी तीच्या दारात उभा होतो तेव्हा!! बाईपण भारी देवासाठी जर ती नाही म्हणाली तर??? मनात चलबिचलता! पण भुमिका ऐकताच एका क्षणात होकार दिला. पुढे काम करताना जाणवलं की, ती खुप सोपी आहे. तीचं तीचं तीने रिंगण निर्माण केलंय, ते तीच्या कामाने! तीचात attitude नाही... पण खुपचं professional approach आहे.'






संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे'; 'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या यशानंतर कलाकारांनी व्यक्त केल्या भावना