Marathi Serials : मालिकाविश्वात (Marathi Serials) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. 'कुन्या राजाची गं तू रानी' (Kunya Rajachi Ga Tu Rani) , 'सिंधुताई माझी माई' (Sindhutai Mazi Mai) तसेच 'सारेगमप लिटील चॅम्प्स' सारखा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एकंदरीत छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


सिंधुताई माझी माई (Sindutai Mazi Mai) : 'सिंधुताई माझी माई' ही मालिका येत्या 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका असणार आहे. आता या मालिकेत सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


सारेगमप लिटिल चॅम्प्स (SaReGaMaPa Little Champs) : 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 9 ऑगस्टपासून या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलील कुलकर्णी आणि वैशाली माडे या कार्यक्रमाचे परिक्षक असणार आहेत. 


कुन्या राजाची गं तू रानी (Kunya Rajachi Ga Tu Rani) : 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डोंगरपाड्यासारख्या छोट्याश्या गावात वाढलेल्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट या मालिकेतून पहायला मिळेल. अभिनेता हर्षद अतकरी आणि शर्वरी जोग या मालिकेत मु्ख्य भूमिकेत आहेत. 






अबोल प्रीतीची अजब कहाणी (Abol Pritichi Ajab Kahani) : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका 17 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. राजवीर आणि मयूरीची प्रेमकहाणी या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


सारं काही तिच्यासाठी (Sara Kahi Tichyasathi) : 'सारं काही तिच्यासाठी' ही नवी मालिका येत्या 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षक आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. 


संबंधित बातम्या


Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमोनं वेधलं लक्ष