Sindhutai Mazi Mai: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. अनेक अनाथांच्या त्या आई झाल्या. गेल्या वर्षी सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. सिंधुताईंना त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडथळींचा सामना करावा लागला होता. आता सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास छोट्या पडद्यावरील एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर मांडण्यात येणार आहे. “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
“सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेच्या प्रोमोमध्ये सिंधुताई आणि चिंधी म्हणजेच बालपणीच्या सिंधुताई यांच्यामधील संवाद दाखवण्यात आला आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं,'अडथळ्यांची शर्यत चिंधीने प्रेमाने जिंकली, अनाथ लेकरांची आई “सिंधुताई” झाली..पाहा, नवी चरित्रकथा “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची”, 15 ऑगस्टपासून संध्या. 7.00 वा'
पाहा प्रोमो:
तसेच काही दिवसांपूर्वी “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं,'मातृत्वाचा झरा बनून झाली ती लाखो अनाथ लेकरांची आई..पाहा, नवी चरित्रकथा "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची". या प्रोमोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
"सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेत कोणती अभिनेत्री सिंधुताई यांची भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटामध्ये सिंधुताई यांचा प्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सिंधुताई यांची भूमिका साकारली होती. आता "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेच्या माध्यमातून सिंधुताई यांच्या बालपणाची गोष्ट पाहण्यास प्रेक्षक उत्सुकत आहेत.
संबंधित बातम्या :
Sindhutai Sapkal : 'हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या...'; माईंसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट