एक्स्प्लोर

घरबसल्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी, ‘प्रवाह पिक्चर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

15 मे पासून 'प्रवाह पिक्चर' ही नवी चित्रपट वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. घरबसल्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

मुंबई : डिस्ने स्टारने नुकतंच 'प्रवाह पिक्चर' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. 15 मे पासून 'प्रवाह पिक्चर' ही नवी चित्रपट वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. घरबसल्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दर आठवड्याला नव्या सिनेमाचा प्रीमियर 'प्रवाह पिक्चर' ही वाहिनी करणार आहे. मराठी चित्रपट वाहिनीत असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.

"स्टार प्रवाहने मराठी भाषिक प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. प्रवाह पिक्चरसह प्रवाह ब्रँडचा विस्तार करताना आणि आमच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक रोमांचक नवीन वाहिनी आणताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबासह उत्कृष्ट मराठी चित्रपट पाहण्याची आणि  महाराष्ट्राची संस्कृती साजरी करण्यासाठी एकत्र येण्याची संधी निर्माण करत आहोत," अशी भावना केविन वाझ, नेटवर्क एंटरटेनमेंट चॅनल्स, डिस्ने स्टार, प्रमुख यांनी व्यक्त केली.

प्रवाह पिक्चरवर प्रीमियर्सचा हा खजिना 'पावनखिंड' या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमापासून सुरु होणार आहे. 12 जूनला हा धमाकेदार सिनेमा पाहाता येईल. चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि आस्ताद काळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. पावनखिंड सिनेमा पहिल्या पाच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही आहे. यासोबतच हेमंत ढोमे दिग्दर्शित मल्टीस्टारर 'झिम्मा' हा आणखी एक सुपरहिट चित्रपट प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ अभिनीत 'कधी आंबट कधी गोड' आणि 'प्रवास', सुपरस्टार स्वप्नील जोशीचा 'बाली', महेश मांजरेकर यांचा 'ध्यानीमनी', मल्टीस्टारर आणि समीक्षकांनी प्रशंसित 'कारखानीसांची वारी' येत्या काही आठवड्यांत प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

प्रवाह पिक्चर या नव्या वाहिनीच्या लॉन्चची घोषणा स्टार प्रवाहवर रविवारी, 3 एप्रिल 2022 रोजी 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022' दरम्यान, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या खास प्रसंगी स्टार प्रवाहच्या कलाकारांनी सुप्रसिद्ध मराठी गाण्यांवर अनोखा नृत्याविष्कार सादर केला.

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Embed widget