Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्रा दिपूला सांगणार सानिकाच्या लग्नामागचं सत्य
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत आजच्या भागात इंद्रा दिपूला सानिकाच्या लग्नामागचं सत्य सांगणार आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. एकीकडे मालिकेत इंद्रा आणि दिपूची प्रेमकहाणी फुलत आहे. तर दुसरीकडे त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. आजच्या भागात इंद्रा दिपूला सानिकाच्या लग्नामागचं सत्य सांगताना दिसणार आहे.
सानिकाने पळून जाऊन इंद्राच्या नालायक भावासोबत लग्न केल्याने दिपूला मोठा धक्का बसला आहे. आजच्या भागात कार्तिक दिपूकडे त्याची बाजू मांडताना दिसणार आहे. कार्तिक सानिकाचं लग्न लाऊन देणं ही माझी इच्छा नव्हती, तर माझा नाईलाज होता, हे इंद्रा दिपूला सांगणार आहे.
View this post on Instagram
दिपूला इंद्राची बाजू समजल्यानंतर ती इंद्राला समजून घेणार का हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशपांडे सर सानिकाच्या लग्नाची तयारी करत असताना त्यांना सानिकाचे कार्तिकसोबत लग्न झालेले कळेल तेव्हा त्यांना मोठा धक्का बसणार आहे. इंद्रा-दिपू हे सर्व कसे सांभाळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या
Jhund Box Office Collection Day 1: नागराज मंजुळेंच्या 'झुंड'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!
आलिया भटच्या Gangubai Kathiawadi ची बॉक्स ऑफिसवर धमाल, 100 कोटी क्लबमध्ये समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha