(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Man Udu Udu Zhala : शलाकाने केली कमाल; उघडले आईचे डोळे
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत आईने इंद्रा आणि दीपूचे प्रेम मान्य केलं आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच या मालिकेत प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळाला. इंद्रा आणि दीपूचे प्रेम अखेर आईने मान्य केले आहे.
दीपू आणि इंद्राच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास आईने नकार दिला होता. दरम्यान शलाकाची तिच्या नवऱ्यापासून सुटका करत इंद्रा तिला देशपांडे सरांच्या घरी राहायला घेऊन आला. आणि त्यामुळेच मालिकेच्या आगामी भागात शलाका इंद्रा किती चांगला आहे ते आईला सांगताना दिसणार आहे.
View this post on Instagram
मालिकेच्या आगामी भागात इंद्रा नयन आणि त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा देताना दिसणार आहे. 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.
संबंधित बातम्या