(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Man Udu Udu Zhala : इंद्रा शलाकाला वाचवण्यात यशस्वी; दीपूसमोर आलं सत्य
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत शलाका आता माहेरी राहायला आली आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच या मालिकेत प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळाला. शलाकाने दीपूला अखेर नयन आणि स्नेहलताने छळ केल्याचं सत्य सांगितलं आहे. त्यामुळेच दीपू शलाकाला घेऊन देशपांडे सरांकडे राहायला येणार आहे.
अखेर दीपिका आणि इंद्रा शलाकाला वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. नयन आणि स्नेहलताने शलाकाचा खूप छळ केला आहे. दीपूला याचा प्रचंड राग येतो. त्यामुळे ती नयनच्या कानाखाली मारते. शलाकाला वाचवण्यात दीपिका आणि इंद्रा यशस्वी झाले असले तरी इंद्राने शलाकाचा संसार मोडला असे आईला वाटते.
View this post on Instagram
'मन उडू उडू झालं' मालिकेत सध्या इंद्रा-दीपूला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'मन उडू उडू झालं' मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे.
संबंधित बातम्या