एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावणार ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण; रंगणार धमाल हास्यमैफील

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण हजेरी लावणार आहे. नुकताच याबद्दलचा एक प्रोमो आऊट झाला आहे.

Maharashtrachi Hasyajatra : संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra). घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू या' म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! या वर्षीही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे. या कार्यक्रमातून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. 

रंगणार धमाल हास्यमैफील

नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता कार्यक्रमात येणार आहे ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण. ईशिताने चक्क महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसन साकारण्याचे धाडस केले आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप या दोघांबरोबर ईशिता आपले प्रहसन सादर करणार आहे. आजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असते. पण आपली ही आवडती अभिनेत्री आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात प्रहसन करताना पाहायला मिळेल. प्रेक्षक नक्कीच पोट भरून हसण्यासाठी तयार असतील.

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'ऐका दाजीबा' फेम ईशिता अरुण लावणार हजेरी!

'ऐका दाजीबा' गाण्यामुळे ईशिता अरुण ही दाजीबा गर्ल म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध झाली आहे. 22 वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडते. पण या वीकएंडला ईशिता अरुण हिच्याबरोबर धमाल हास्यमैफील रंगणार आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण  साकारणार आहे. अतिशय धमाल असे हे प्रहसन या वीकएंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ईशिता अरुण यांचा मराठीतला कॉमेडी  अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे. 

कॉमेडीचा बाज, अचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे. यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरी. यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले , दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. 

संबंधित बातम्या

Bollywood Actress : आलिया भट्ट ते तापसी पन्नू, मासिक पाळीचा 'या' अभिनेत्रींना होतोय त्रास; म्हणाल्या,"पीरियड्स लीव्ह..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात''; ठाकरेंचा हल्लाबोल
''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात''; ठाकरेंचा हल्लाबोल
भारत-इंग्लंड सामन्यावेळी पाऊस आला तर.. 250 मिनिटाचा आयसीसीचा नियम काय सांगतो?
भारत-इंग्लंड सामन्यावेळी पाऊस आला तर.. 250 मिनिटाचा आयसीसीचा नियम काय सांगतो?
Narendra Mehta : आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
IND vs ENG : पावसाच्या सरी की षटकारांचा पाऊस? गयानामध्ये पावसाने झोडपलं तरीही उपांत्य सामना होणारच! 
IND vs ENG : पावसाच्या सरी की षटकारांचा पाऊस? गयानामध्ये पावसाने झोडपलं तरीही उपांत्य सामना होणारच! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake Full PC : शासनाला आरक्षण संपावयचं, मुख्यमंत्री OBC च्या खाण्यात माती मिक्स करतातPrasad Lad On Lift :ठाकरे-फडवीस लिफ्टमधून एकत्र लाड म्हणाले,  प्रेम असंच चालू राहू देUddhav Thackeray Devendra Fadnavis Lift  : ठाकरे-फडणवीसांचा लिफ्टमधून एकत्र प्रवास, सोबत कोण कोण?Vijay Waddetiwar On Farmers Issue : पीक वीमा फसवा, वडेट्टीवारांचे सरकारवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात''; ठाकरेंचा हल्लाबोल
''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात''; ठाकरेंचा हल्लाबोल
भारत-इंग्लंड सामन्यावेळी पाऊस आला तर.. 250 मिनिटाचा आयसीसीचा नियम काय सांगतो?
भारत-इंग्लंड सामन्यावेळी पाऊस आला तर.. 250 मिनिटाचा आयसीसीचा नियम काय सांगतो?
Narendra Mehta : आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
IND vs ENG : पावसाच्या सरी की षटकारांचा पाऊस? गयानामध्ये पावसाने झोडपलं तरीही उपांत्य सामना होणारच! 
IND vs ENG : पावसाच्या सरी की षटकारांचा पाऊस? गयानामध्ये पावसाने झोडपलं तरीही उपांत्य सामना होणारच! 
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र
Laxman Hake: जरांगे नावाच्या बुजगावण्याकडून आमचं आरक्षण संपवलं जातंय, एकनाथ शिंदेंनी आमच्या जीवनात माती कालवू नये: लक्ष्मण हाके
एकनाथ शिंदे-मनोज जरांगेंची मिलीभगत, बोगस कुणबी नोंदींद्वारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव: लक्ष्मण हाके
Lok Sabha Election 2024 : 'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी अन् फडणवीस विरोधी लाटा'; असीम सरोदेंचा मोठा दावा
'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी अन् फडणवीस विरोधी लाटा'; असीम सरोदेंचा मोठा दावा
Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
Embed widget