एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gaurav More: "बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना..."; गौरव मोरेनं शेअर केला खास व्हिडीओ
Gaurav More: नुकताच एक खास व्हिडीओ गैरवनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरव मोरेचा (Gaurav More) चाहता वर्ग मोठा आहे. गौरवच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. गौरव हा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकताच एक खास व्हिडीओ गैरवनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
गौरव मोरेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो काही वह्यांवर सही करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला "अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश में लग जाती है" हा ओम शांती ओम या चित्रपटातील शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) डायलॉग ऐकू येत आहे. गौरवनं या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
गौरव मोरेनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याला एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सांगलीत (महापरिनिर्वाण) सिनेमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि जिथे शूट करत होतो त्याच्या बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना समजले की, माझं शूटिंग चालू आहे तर मुलं रोज फोटो काढायला आणि ऑटोग्राफ घ्यायला येत होती. तर त्या दिवशी असा हा ऑटोग्राफचा खच माझ्याकडे आला तो हा क्षण थँक्यू सो मच लहान लहान बच्चूना एवढं प्रेम दिल्ल्याबद्दल" गौरवनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
गौरव मोरेचा बाईज-4 (Boyz 4) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 20 ऑक्टोबर रोजी बाईज-4 हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
निवडणूक
Advertisement