Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Aai Kuthe Kay Karte: निखिल घरी आल्यामुळे अनिरुद्धची होणार चिडचिड; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की, निखिल हा अनिरुद्धच्या घरी येतो आणि अप्पांना जवळ घेऊन नमस्कार करतो. तो अप्पांना म्हणतो, 'तुम्ही माझी आठवण काढली आणि मी तुम्हाला भेटायला आलो.' निखिल हा यश आणि ईशा यांना देखील भेटतो.
Pravin Tarde: 'ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल...'; आषाढी एकादशीनिमित्त प्रवणी तरडेनं शेअर केली खास पोस्ट
Pravin Tarde: आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता प्रवणी तरडेनं (Pravin Tarde) देखील आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Prajakta Mali: 'तू देवदूत आहेस'; प्राजक्तानं समीर चौघुलेसाठी शेअर केली पोस्ट
Prajakta Mali: प्रसिद्ध अभिनेता समीर चौघुलेचा (Samir Choughule) आज (29 जून) 50 वा वाढदिवस आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा समीर हा प्रेक्षकांना त्याच्या विनोदी शैलीनं खळखळून हसवतो. नुकतीच समीरच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Adah Sharma: 'द केरळ स्टोरी'फेम अदा शर्मानं गायलं ‘रखुमाई रखुमाई’ गाणं; आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला खास व्हिडीओ
Adah Sharma: द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकताच अदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पोश्टर गर्ल या चित्रपटातील ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणं गाताना दिसत आहे.
