Prajakta Mali: प्रसिद्ध अभिनेता समीर चौघुलेचा (Samir Choughule) आज (29 जून) 50 वा वाढदिवस आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा समीर हा प्रेक्षकांना त्याच्या विनोदी शैलीनं खळखळून हसवतो. नुकतीच समीरच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


प्राजक्ताची पोस्ट


समीरच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं त्याच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, ग्धशर्करा योग..! आषाढी एकादशीला तूझा 50 वा वाढदिवस आला. खरचं, सगळ्या जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूतच आहेस. तुझ्यामुळे माझ्या दाद देण्याला ओळख मिळाली आणि मी “वाह् दादा वाह् fame- प्राजक्ता” झाले..आणि ही ओळख आयूष्यभर राहील, असं वाटतं. तू अतिशय कष्टाळू, नम्र, भाबडा आणि अवलिया कलाकार आहेस; तूला आत्तापर्यंत मिळालेलं यश,प्रेम ही तर फक्त सुरूवात ठरो.., आणि इथून पुढे देवाचा आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम तुझ्यावर धुव्वाधार बरसत राहो; ह्याच तूला 50  व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!'






प्राजक्तानं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या पोस्टला कमेंट करुन समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'लक्ष्मीकांत बेर्डे नंतर हास्यजत्रा या कार्यक्रमानी हसवले, सगळे कलाकार छान आहेत, समीर तुम्ही तर 1च नंबर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' अशी कमेंट एका नेटकऱ्यानं प्राजक्ताच्या पोस्टला केली. 


समीरचे चित्रपट 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच समीरने  जग्गू आणि ज्युलिएट, चंद्रमुखी, मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये काम केले आहे. समीरची  एका काळेचे मणी ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. समीर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असतो.  आज सोशल मीडियाच्या माध्यमातून समीरचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :   


Samir Choughule: खळखळून हसवणाऱ्या समीर चौघुलेबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?