KBC 15 Promo: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा शो लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक सीझन हिट ठरला आहे.आता या कार्यक्रमाचा 15 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच 'कौन बनेगा करोडपती-15'चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी असा अंदाज लावत आहे की, 'कौन बनेगा करोडपती-15' मध्ये काही ट्वीस्ट असणार आहेत.


'KBC 15' चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रमोमध्ये अमिताभ बच्चन  हे,“बदल रहा है, देखो सब कुछ बदल रहा है” असे म्हणताना दिसत आहेत.  


प्रोमो बिग बी हे सोशल मीडिय, कंटेन्ट क्रिएटर आणि लहान व्यवसायांच्या यशाबद्दल देखील बोलतात. आज लोक त्यांच्या मोबाईल फोनच्या एका क्लिकवर विविध पदार्थ ऑर्डर करु शकतात.  टेक्नोलॉजीमुळे कुटुंबं कशी जवळ आली आहेत, हे 'KBC 15' च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. 


प्रोमोच्या शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात की, जेव्हा एखादा देश बदलतो आणि विकसित होतो तेव्हा ते प्रगतीचे लक्षण असते. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी असा अंदाज लावत आहेत की,  केबीसीच्या या सीझनमध्ये काही ट्वीस्ट येणार आहेत. पण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी या ट्वीस्टबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. 


पाहा प्रोमो: 






कौन बनेगा करोडपती 15 शोसाठीची नोंदणी एप्रिलमध्ये सुरू झाली होती. एका रिपोर्टनुसार, पुढील महिन्यापासून या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे.अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून हा शो होस्ट करत आहेत. फक्त तिसरा सीझन अभिनेता शाहरुख खानने होस्ट केला होता.  विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. 


केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Kaun Banega Crorepati: 'केबीसी 15' मध्ये सहभागी व्हायचंय? 'या' दिवशी होणार रजिस्ट्रेशनला सुरुवात; मजेशीर प्रोमोमध्ये बिग बींनी दिली माहिती