Pravin Tarde: आज (29 जून) आषाढी एकादशी (Aashadhi Wari 2023) आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेता प्रवणी तरडेनं (Pravin Tarde) देखील आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


प्रवणी तरडेची पोस्ट


प्रवीण तरडेनं सोशल फेसबुकवर त्याच्या आई-वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रवीणचे आई-वडील हे विठुरायाचे दर्शन घेताना दिसत आहेत. या फोटोला प्रवीणनं कॅप्शन दिलं, 'काही महिन्यांपूर्वी आईवडीलांना म्हणालो बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो , म्हणाल त्या देशात.. ते म्हणाले पंढरपूरला घेऊन चल .. मी म्हणालो पंढरपूर? का? तर ते म्हणाले की पन्नास वर्ष चालत वारी करतोय पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं , धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा.. जरा निरखून पहायचाय..'


पुढे कॅप्शनमध्ये प्रवीणनं  'मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला.. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं.. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्ष का टिकून आहे .. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं..वारी चाललेल्या प्रत्येक माऊलीला आषाढीच्या खुप खुप शुभेच्छा'



प्रवीणच्या (Pravin Tarde) या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी प्रवीणच्या पोस्टला कमेंट करुन त्याचं कौतुक केलं आहे. 


प्रवीणचे चित्रपट


गेल्या महिन्यामध्ये प्रवीण तरडेचा बलोच (Baloch) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्याच्या चौक (Chowk) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  चौक या चित्रपटात संस्कृती बालगुडे,स्नेहल तरडे  ,रमेश परदेशी,अक्षय टांकसाळे,देवेंद्र गायकवाड,किरण गायकवाड, उपेंद्र लिमये (Upendra Limaye) या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रवीणच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. प्रवीण त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. 






वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी