Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या  प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की, निखिल हा अनिरुद्धच्या घरी येतो आणि अप्पांना जवळ घेऊन नमस्कार करतो. तो अप्पांना म्हणतो, 'तुम्ही माझी आठवण काढली आणि मी तुम्हाला भेटायला आलो.' निखिल हा यश आणि ईशा यांना देखील भेटतो. 


निखिल अनिरुद्धला पाहून घाबरतो. ते पाहिल्यानंतर संजना म्हणते, 'निखिल तुला इथे कोणीही ओरडणार नाही, मी आहे इथे, काळजी करु नकोस.' निखिलनं अनघासाठी एक ग्रीटिंग कार्ड देखील बनवलेले असते. ते कार्ड पाहून आनघाला खूप आनंद होतो. मी छकुलीला जवळ घेऊ का? अनघा त्याला 'हो' असं म्हणते. हे ऐकल्यानंतर अनिरुद्ध चिडतो.


अनिरुद्ध निखिलला म्हणतो, 'तू छकुलीला हातसुद्धा लावायचा नाही, माझी नात आहे ती. हा मुलगा दरवेळी इथे आला की काही ना काही घोळ घालतो.' त्यानंतर अप्पा अनिरुद्धला म्हणतात, 'लहान मुलांच्या समोर आरडा ओरडा करु नये, हे मी तुला किती वर्ष झालं सांगतोय'


आता अनिरुद्धच्या मनात निखिलबद्दलचा राग निघून जाईल की नाही? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये मिळेल.  


पाहा प्रोमो: 






आई कुठे काय करते या मालिकेमध्ये  मधुराणी प्रभुलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात तर अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते  मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे हे कालाकार देखील या मालिकेध्ये प्रमुख भूमिका साकारतात. 


आई कुठे काय करते या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाल्या, 'मोस्ट फेव्हरेट...'