Telly Masala  : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका आणि चित्रपट अनेक लोक न चुकता बघतात. चित्रपट आणि मालिकांमधील कलाकारांच्या आयुष्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. तर जाणून घ्या मराठी मालिका आणि चित्रपट विश्वासंबंधित बातम्या..


Madhavi Nimkar: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील खडूस शालिनी खऱ्या आयुष्यात आहे मल्टी टॅलेंटेड; जाणून घ्या फिटनेस फ्रीक माधवी निमकरबद्दल...


Madhavi Nimkar:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर शालिनी ही भूमिका साकारते. शालिनी ही जयदीप आणि गौरीला त्रास देण्याचे काम करत असते. जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात अडथळे निर्माण करायचे एवढेच काम शालिनीला जमत असतं. पण शालिनी ही भूमिका साकारणारी माधवी निमकर ही खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे. ती मल्टी टॅलेंटेड असून फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे. जाणून घेऊयात माधवी निमकरबद्दल...



Ashi Hi Banwa Banwi : 'अशी ही बनवाबनवी'चे चाहते आहात? सिनेमाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात


Ashi Hi Banwa Banwi : 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) हा विनोदी सिनेमा 23 सप्टेंबर 1988 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. खळखळून हसवणारा हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. या सिनेमातील संवाद, लिंबू कलरची साडी अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या बहुचर्चित गाजलेल्या सिनेमासंबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या...



Sudipto Sen Next Project Bastar:  ' 76 CRPF जवान आणि 8 गरीब गावकरी...'; बस्तर चित्रपटाबाबत सुदिप्तो सेन यांनी दिली माहिती


 Sudipto Sen Next Project Bastar:  दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen)  यांच्या   द केरळ स्टोरी (The Kerala Story)  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच त्यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाचं नाव 'बस्तर' (Bastar) असं आहे. बस्तर या चित्रपटाची माहिती सुदीप्तो सेन यांनी ट्विटरवर दिली आहे. 



Ratris Khel Chale : 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अण्णांच्या शेवंताचा झालाय घटस्फोट; जाणून घ्या पूर्वाश्रमीचा पतीबद्दल...


Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे अपूर्वा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतली तिची 'शेवंता' ही भूमिका चांगलीच गाजली. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi) चौथं पर्वदेखील तिने चांगलच गाजवलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा