Housefull 5 First Review: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' (Housefull 5) चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट 6 जून रोजी प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर (Housefull 5 Trailer), स्टारकास्ट आणि गाणी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकही त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 6 जून रोजी प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतरच समीक्षक या चित्रपटाचा रिव्यू देतीलच. दरम्यान, उमर संधू यांनी परदेशात हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा पहिला रिव्यू दिला आहे. त्यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊयात...
'हाऊसफुल 5' कसा आहे?
उमर संधू यांनी 'हाऊसफुल 5' हा सिनेमा कसा आहे? याबाबत फक्त दोन ओळींमध्ये लिहिलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलंय की, "हाऊसफुल 5' चा पहिला आढावा! चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते! सर्व कलाकारांच्या कर्कश अभिनयासह वाईट विनोद!!"
संधू एवढंच बोलून थांबले नाहीत. अक्षय कुमारवर निशाणा साधत त्यांनी पुढे लिहिलं की, "भारतात बनवलेल्या सर्वात वाईट विनोदांपैकी एक!! पूर्ण डोकेदुखी आणि जबरदस्तीनं स्वस्त विनोद! तुमचे पैसे वाचवा आणि चित्रपट टाळा."
संधू यांनी त्याच्या पहिल्याच रिव्ह्यूमध्ये 'हाऊसफुल 5' ला 5 पैकी फक्त एक स्टार दिला आहे. दरम्यान, हे संधू यांचा स्वतःचा चित्रपटाचा रिव्ह्यू असू शकतो. चित्रपट कसा आहे आणि प्रेक्षकांना तो किती आवडतो, हे आपल्याला 6 जून रोजी पहिल्या दिवशीच कळू शकेल.
'हाऊसफुल 5'ची धाकड अॅडव्हान्स बुकिंग
सॅकनिल्कच्या मते, फिल्मनं पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत जवळपास 12 हजार टिकीटं विकलीत आणि ब्लॉक सीट्ससोबत जवळपास 2.88 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे.
फिल्म रिलीज होण्यासाठी अजून 5 दिवस बाकी आहेत आणि ही फिल्म पहिल्या दिवशी यापेक्षा कित्येक पटींनी कमाई करू शकते. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमाची फिल्म 27.50 कोटींचं ओपनिंग कलेक्शन करू शकते.
'हाऊसफुल 5'ची स्टार कास्ट
तरुण मनसुखानी दिग्दर्शित हा चित्रपट सुमारे 375 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे, असं कोइमोई यांनी सांगितलं. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, नाना पाटेकर यांच्यासह फरदीन खान, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, दिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लिव्हर आणि निकितिन धीर यांच्या भूमिका आहेत. नर्गिस फाखरी, जॅकलिन, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग आणि सौंदर्या शर्मा हे देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :