Sudipto Sen Next Project Bastar: दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांच्या द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच त्यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाचं नाव 'बस्तर' (Bastar) असं आहे. बस्तर या चित्रपटाची माहिती सुदीप्तो सेन यांनी ट्विटरवर दिली आहे.
सुदीप्तो सेन यांचे ट्वीट
सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी ट्विटरवर बस्तर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं, '6 एप्रिल 2010 रोजी, छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बस्तरच्या दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतलनेर गावात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 76 CRPF जवान आणि 8 गरीब गावकरी शहीद झाले होते. बरोबर 14 वर्षांनी याला काव्यात्मक पद्धतीनं न्याय मिळेल. द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर सादर करत आहोत- बस्तर! विपुल शाह आणि सनशाइन पिक्चर्सचे आभार मानतो. 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये भेटूयात! ' सुदीप्तो सेन यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6 एप्रिल 2010 रोजी बस्तरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर 'बस्तर' या चित्रपटाचं कथानक असणार आहेत, हे सुदीप्तो सेन यांचे ट्वीट पाहिल्यानंतर कळते. 'Hidden Truth That Will Take The Nation By Storm' असं बस्तर चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिलेलं आहे. विपुल शाह (Vipul Shah) हे बस्तर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
'लखनऊ टाइम्स', 'आसमा' , 'गुरु जी: अहेड ऑफ टाइम' , 'गुरुजन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. सुदीप्तो सेन यांच्या काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली. आता द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर सुदीप्तो सेन यांच्या 'बस्तर' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: